Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष




राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या प्रसंगावधानाने तब्बल १७४ लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एका ‘कॅप्टन’च्या धाडसाचे आणि शौर्याचे प्रचंड कौतुक केले. १७४ प्राण वाचवणाऱ्या ‘कॅप्टन’ला सलाम प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कॅप्टनच्या वेळेवर निर्णय घेण्याच्या क्षमतेची स्तुती केली. ते म्हणाले, “या कॅप्टन माच्छर अतिशय शौर्य आणि वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आहे. त्यांनी १७४ लोकांचे प्राण वाचवले असून, या धाडसी कामगिरीबद्दल संपूर्ण जगाने त्यांचे कौतुक केले आहे आणि आपणही त्यांचे आधीच अभिनंदन केले आहे.” ‘पंतप्रधान मोदींचे कार्य कॅप्टनला प्रेरणा देते’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॅप्टनचे सर्वप्रथम अभिनंदन केले होते. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, कॅप्टन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीजींचे कार्य त्यांना नेहमीच प्रेरित करत असते आणि प्रेरणा देत असते. ज्या व्यक्तीने आपल्या शौर्याने १७४ लोकांचे प्राण वाचवले आणि ज्याचे संपूर्ण जग कौतुक करत आहे, तोच कॅप्टन आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे कौतुक करत आहे. त्यांनी काढलेले हे गौरवउद्गार आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.” विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर अचानक दिल्ली दौरा एकिकडे उपमुख्यमंत्र्यांनी या कॅप्टनच्या शौर्याचे कौतुक केले, तर दुसरीकडे त्यांचा अचानक ठरलेला दिल्ली दौरा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात सध्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या ५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आणि पक्षातही काही प्रमाणात बंडखोरी वाढल्याचे चित्र आहे. काही जागांवरून वाद आणि रस्सीखेच वाढताना दिसत असून, या बंडखोरांचे बंड शांत करून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान उपमुख्यमंत्र्यांसमोर आहे. याच जागावाटपाच्या आणि बंडखोरीच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ——————- ही बातमी पण वाचा.. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत, पासपोर्ट जप्त करा!:नितेश राणेंचा दावा, म्हणाले- रोहित पवारांनी तारीख-वेळ सांगावी, मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच! “मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार आहे; त्यामुळे रोहित पवारांनी इकडे-तिकडची भाषा करण्यापेक्षा स्वतः कधी मंत्री होणार याची तारीख आणि वेळ आधी जाहीर करावी,” असा जोरदार टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी रोहित पवार, ठाकरे बंधूंचा मोर्चा, आदित्य ठाकरे, सीजेपीचे आंदोलन, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यांवरून चौफेर हल्लाबोल केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *