Headlines

Mumbai Congress HQ Midnight Arrest Controversy


“राज्यातील आणि देशातील हुकूमशाही सरकारने सर्व कायदे, नियम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवण्याचे नीच कृत्य सुरू केले आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थिनी मध्यरात्री विश्वासाने काँग्र

.

आदिवासी विद्यार्थिनींवर मध्यरात्री कोणाच्या अधिकारात कारवाई?

घडलेल्या धक्कादायक घटनेचा पाढा वाचताना अतुल लोंढे म्हणाले, “भारतीय कायद्यानुसार कोणत्याही महिलेला किंवा विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी, अंधारात अटक करता येत नाही. मग काल मध्यरात्री काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात—टिळक भवनमध्ये घुसून विद्यार्थिनींना ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? एवढी मग्रुरी आणि हिंमत पोलीस प्रशासनामध्ये कुठून आली?”

हक्कासाठी आलेली मुले आश्रयाला होती

“आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ही गरीब आदिवासी मुले-मुली मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनासाठी येत होती. रात्रीच्या वेळी सुरक्षित जागा म्हणून ती विश्वासाने काँग्रेसच्या कार्यालयात थांबली होती. मात्र, सरकारने गुन्हेगारांप्रमाणे पोलिसांचा वापर करून या निरपराध आदिवासी मुलींवर अत्याचार करण्याचे काम केले आहे.”

सरकारे येतील आणि जातील; लोंढेंचा इशारा

सरकारच्या या दडपशाहीवर संताप व्यक्त करत काँग्रेस प्रवक्त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सुनावले, “लक्षात ठेवा, सत्तेची मस्ती कायम राहत नाही. सरकारे येत राहतील आणि जात राहतील. आमचे राजकीय कार्यालय आहे, तशीच तुमचीही राजकीय कार्यालये राज्यात जागोजागी आहेत. विरोधकांच्या कार्यालयात मध्यरात्री पोलीस पाठवून कारवाया करण्याचे जे पायंडे तुम्ही पाडत आहात, त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, याचा गांभीर्याने विचार करा.”

“राज्य सरकारने दाखवलेला हा कायदेद्रोही आणि बेकायदेशीर कारभार काँग्रेस कधीही सहन करणार नाही. आम्ही महायुती सरकारला जाहीर वॉर्निंग देतो की, दडपशाहीचे हे धंदे तत्काळ बंद करा.”

एनएसयूआय प्रदेशाध्यक्षांची सुटका करा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा!

विद्यार्थी आंदोलकांवर होणाऱ्या दडपशाहीवर भाष्य करताना त्यांनी मागणी केली, “विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या हक्काचा लढा लढत असलेले एनएसयूआयचे (NSUI) प्रदेशाध्यक्ष यांनाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे डांबून ठेवले आहे. हक्काची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुच्छ लेखून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.”

“सरकारने विद्यार्थ्यांशी तात्काळ चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधून त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत. लाठीमार आणि अटकेच्या जोरावर लोकशाहीचा आवाज दाबता येत नाही. तुम्ही कशा प्रकारे संविधानाची पायमल्ली करत आहात, हे राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून येणाऱ्या काळात जनताच तुम्हाला धडा शिकवेल,” असा घणाघात अतुल लोंढे यांनी शेवटी केला.

———————————–

हेही वाचा…

फडणवीसांचे राजकारण ओहोटीला लागले: शहा इतके घाबरलेत की दिल्लीत घरासमोर सैन्य तैनात, सत्ताधाऱ्यांचा मेंदू ब्रिटिशांसारखा हललाय- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसते. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला दिल्लीत जाणार आहात तिथे आपले स्थान आहे.तर ते स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करुण घेत आहेत. कालचा मोर्च्यात हजारो लोकं एकत्र येत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली, हे काही रडगाणं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतात त्याला रडगाणं म्हणतात, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.