![]()
पुण्यात एका डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहिणी सुकुमार खेमाणे (वय 32, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. एका 47 वर्षीय डॉक्टरने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉक्टरचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे. आरोपी महिलेची डॉक्टरशी ओळख झाली. तिने डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वेळोवेळी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार देण्याची आणि तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. या धमक्या देऊन महिलेने गेल्या एका महिन्यात डॉक्टरकडून 14 लाख 30 हजार रुपये घेतले. तिने रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही देखील चोरून नेली. ती वही परत देण्यासाठी महिलेने आणखी 10 लाख रुपयांची मागणी केली. महिलेच्या धमक्यांना कंटाळून डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार दिली. अटकेची भीती दाखवून महिलेची 18 लाखांची फसवणूक काळ्या पैसे व्यवहारात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची 18 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 42 वर्षीय महिला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात राहायला आहे. 23 सप्टेंबर रोजी महिलेने समाज माध्यमातील खाते पाहिले. तेव्हा अशोक पटेल नावाच्या सायबर चोरट्याने महिलेला संदेश पाठविला होता. लंडनहून तुम्हाला महागड्या भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत ,अशी बतावणी अशोक पटेल असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने केली. महिलेने ऑनलाइन पद्धतीने सौंदर्यप्रसाधने केली होती. त्यामुळे संबंधित कंपनीकडून भेटवस्तू पाठविण्यात आली, असा समज महिलेचा झाला. शहानिशा न करता महिलेने स्वत:ची माहिती सायबर चोरट्यांना पाठविली. त्यानंतर कविता शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लंडनहून पाठविण्यात आलेल्या भेटवस्तू विमानतळावर जप्त करण्यात आल्या आहेत, अशी बतावणी करण्यात आली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात करण्यात आला असून, या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात येणार आहे,अशी भीती दाखविण्यात आली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे बँक खात्यात जमा करावे लागतील, असे सांगण्यात आले.धमकीमुळे महिला घाबरली. तिने परिचितांकडून हातऊसने पैसे घेतले, तसेच एका सराफी पेढीत दागिने गहाण ठेवले.कुटुंबीयांना याबाबतची माहिती न देता परस्पर सायबर चोरट्यांच्या खात्यात 18 लाख 52 हजार रुपये पाठविले.चोरट्यांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आल्यानंतर तक्रादार महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. संशय आल्याने महिलेने चौकशी केली.तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
Source link
डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 14 लाखांची खंडणी:रुग्णालयातील कागदपत्रे चोरून 10 लाखांची पुन्हा मागणी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल