Headlines

Police Clash At Tilak Bhavan; Harshavardhan Sapkal Attacks Fadnavis


“महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे संविधानाची उघड पायमल्ली आहे. पुण्यात मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी गँगमध्येच एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हे सरकार नसून ‘ट्रिपल इंजिन सरकारची गँग’ आहे आणि या

.

टिळक भवनाला पोलिसांचा वेढा; फडणवीस म्हणजे आधुनिक ‘घाशीराम कोतवाल’!

नाशिकहून लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा सपकाळ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “नाशिकहून शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या न्याय्य हक्कांसाठी आलेले आदिवासी विद्यार्थी दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवनात मुक्कामी होते. सकाळी ते आझाद मैदानाकडे निघण्यापूर्वीच कोणत्याही वॉरंटशिवाय साध्या वेशातील आणि गणवेशातील पोलिसांनी टिळक भवनाला वेढा घातला. गेट बंद करून दहशत निर्माण केली गेली. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ब्रीद विसरून पोलीस गुंडशाही करत आहेत.”

गृहमंत्र्यांचा कारभार हुकूमशाहीकडे

“महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘घाशीराम कोतवाल’प्रमाणे काम करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याऐवजी न्याय मागणाऱ्या तरुण-तरुणींना आणि विद्यार्थिनींना धमकावले जात आहे. हा बंदोबस्त तत्काळ हटवावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल.”

भुजबळांच्या खात्यातील तांदूळ घोटाळा 100 कोटींचा नाही, तर 1 हजार कोटींचा!

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विभागावर होत असलेल्या आरोपांवर सपकाळ म्हणाले, “शासकीय योजनेतील निकृष्ट तांदूळ वाटप आणि राईस मिलर्सच्या संगनमताने सुरू असलेल्या तांदूळ घोटाळ्याची चर्चा सध्या सुरू आहे. हा घोटाळा केवळ 100 कोटींचा नसून, जर याची प्रामाणिकपणे जनसुनावणी घेऊन चौकशी केली, तर हा 1 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा महाघोटाळा असल्याचे समोर येईल.”

‘सत्याग्रह’ पोर्टलवर 48 तासांत 30 हजार आंदोलनांची नोंद

राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मोहिमेची माहिती देताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “देशातील जनआंदोलनांना एकत्र आवाज देण्यासाठी राहुल गांधी यांनी 3 ऑक्टोबर रोजी ‘सत्याग्रह’ ही अधिकृत वेबसाईट सुरू केली. या पोर्टलला अवघे 48 तास पूर्ण होण्यापूर्वीच देशभरातून तब्बल 30 हजार आंदोलने आणि सत्याग्रहांची नोंद झाली आहे. यामध्ये शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि जातिभेदाविरुद्धच्या लढ्यांचा समावेश आहे. हा प्रचंड उद्रेक दाखवून देतो की जनता या मुजोर भाजप सरकारला पूर्णपणे कंटाळली आहे.”

ज्ञानेश कुमार म्हणजे केवळ मुखवटा

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी हल्ला चढवला. “केरळमधील रस्ते घोटाळ्याप्रकरणी ज्ञानेश कुमारांविरोधात चौकशीचे आदेश झाले आहेत. धर्मेंद्र प्रधानांप्रमाणेच ज्ञानेश कुमारांनाही राजीनामा द्यावाच लागेल. मात्र, ज्ञानेश कुमार हा केवळ एक मुखवटा असून यामागील खरे चेहरे दिल्लीत बसलेल्या ‘रंगा-बिल्ला’चे आहेत. मतदार यादीतील ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांचे संविधानिक अधिकार हिरावून घेण्याचे काम सुरू आहे.”

संविधानाचा आत्मा काढण्याचा प्रयत्न

“देशाचा खरा मालक पंतप्रधान नसून सामान्य नागरिक आहे. मतदार यादीतून नावे वगळून लोकशाहीची हत्या केली जात आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही यावर आक्षेप घेतले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता पूर्णपणे संपली आहे.”

महाविकास आघाडीत कोणतीही बंडखोरी नाही

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाची स्थिती स्पष्ट केली. “अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. अमरावतीमध्ये आमची भूमिका परस्परपूरक असून नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्व स्थानिक नेते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ. अभिजित वंजारी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. ही पसंतीक्रमाच्या मतदानाची निवडणूक असल्याने सर्व घटक पक्ष समन्वयाने काम करत आहेत.”

रोहित पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर

“पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रोहित पवार लढत आहेत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांनी रोहित पवारांवर राजकीय शेरेबाजी करण्यापेक्षा एमपीएससी अध्यक्षांची हकालपट्टी सरकार करणार की नाही, याचे आधी उत्तर द्यावे,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

—————————————–

हेही वाचा…

महाराष्ट्रात संविधान आहे की मोगलाई? ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालू:खासदार वर्षा गायकवाड यांचा संताप, म्हणाल्या- पोलिसांची बेकायदेशीर घुसखोरी, शौचालयातील मुलींनाही सोडले नाही

“नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवले जात आहे. पहाटे 4 वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आणि सकाळी 7वाजता दादरच्या ‘टिळक भवन’मध्ये पोलिसांनी विनावॉरंट घुसखोरी करून विद्यार्थिनींना शौचालयातून बळजबरीने बाहेर खेचून अटक केली. महाराष्ट्रात नेमके कायद्याचे राज्य आहे की फडणवीस सरकारचे ‘जंगलराज’ सुरू आहे? जर पोलिसांना आमच्या राजकीय कार्यालयांत अशी बेकायदेशीर घुसखोरी करण्याचा अधिकार असेल, तर आम्हीही उद्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसू,” असा अत्यंत आक्रमक आणि संतप्त इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.