Headlines

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात संपन्न:मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान- रविंद्र चव्हाण




साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते. या संमेलनात माहिती तंत्रज्ञान, AI आणि साहित्य’ या विषयावर आधारित चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. AI मुळे बदलते दैनंदिन जीवन, करिअरच्या संधी आणि रोजगारविश्वावर या संमेलनात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा-साहित्याच्या स्थानावर मान्यवरांचे मंथन यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी डोंबिवलीकर साहित्यप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांचा नांदी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान आहे. हे संमेलन म्हणजे साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला जोडणारा संवादमंच आहे. याप्रसंगी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, साहित्यिक अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा. डॉ. विनय भोळे, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *