Headlines

हॉटेल्स आणि मेन्यू कार्डवर 'चीज ॲनालॉग'चा उल्लेख आता बंधनकारक:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश; 10 दिवसांत 1496 आस्थापनांची तपासणी

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज ॲनालॉग’बाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत. मंत्री…

Read More

25 मे रोजी अमरावतीत शून्य सावली दिवस:दुपारी काही सेकंदांसाठी सावली अदृश्य होणार

येत्या २५ मे रोजी अमरावतीत ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सुमारे ५२ सेकंदांसाठी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल. हा कोणताही चमत्कार नसून एक खगोलीय घटना आहे, जी अमरावतीकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि रोमांचक खगोलीय घटना आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर काही अंशांनी…

Read More

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा ‘भिडेवाडा चित्ररथ’ बुधवार, २० मे रोजी अमरावतीत दाखल होणार असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची माहिती नागरिकांना मिळणार आहे….

Read More

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी स्थायी समितीच्या अध्यक्ष:विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी…

Read More

NEET पेपरफुटीचा लातूर पॅटर्नला मोठा फटका!:RCC च्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, पालकांवरही ओढवले आर्थिक संकट

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसमोर नव्याने तयारी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळाचा आणि अनिश्चिततेचा सर्वाधिक मानसिक तसेच शैक्षणिक फटका लातूरमधील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. गेल्या…

Read More

हिंगोलीत बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई:जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोलपंप चालकांना कडक आदेश, परवापासून होणार अंमलबजावणी

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून गुरुवारपासून ता. २१ या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. इंधनाचा अनधिकृत साठा होऊ नये आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून…

Read More

आरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक:बीएआय आणि आरएमसी असोसिएशनमध्ये बांधकाम क्षेत्रावरील परिणामांवर चर्चा

रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) च्या दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर आणि पुणे आरएमसी असोसिएशन यांच्यात नुकतीच एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत बांधकाम क्षेत्रावर होणारे परिणाम आणि उद्योगासमोरील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचे नेतृत्व बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर आणि पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर…

Read More

भारत फोर्ज विशाखापट्टणममध्ये मरीन गॅस टर्बाइन केंद्र उभारणार:नौदलाच्या स्वावलंबनासाठी खासगी क्षेत्रातील पहिले दुरुस्ती आणि विकास संकुल

पुण्यातील ‘भारत फोर्ज लिमिटेड’ने आंध्र प्रदेश सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, विशाखापट्टणम येथे ‘आंध्र प्रदेश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉर’मध्ये सुमारे ८० एकर जागेत मरीन गॅस टर्बाइनची (एमजीटी) दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकास संकुल उभारले जाईल. भारतात खासगी क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे, जो नौदलाच्या स्वावलंबनाला बळ देईल. पुट्टपर्थी येथे आयोजित…

Read More

आष्टीकर, वाजेंनंतर आता भाऊसाहेब वाकचौरे!:शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या शिंदेंच्या मंत्र्यांसोबत भेटी सुरूच; चर्चेला उधाण

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महायुतीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींनंतर, आता वाकचौरे…

Read More

पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर 18 लाखांचा अपहार:कमी व्याजाचे आमिष दाखवून आरोपीने दागिने परस्पर ठेवले तारण, गुन्हा दाखल

पुण्यात सोन्याच्या दागिन्यांवर कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. कर्वेनगर भागात एका ग्राहकाचे दागिने ताब्यात घेऊन आरोपीने ते परस्पर दुसऱ्या कंपनीत तारण ठेवले. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद शरद पवार (वय ४६, रा. वारजे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Read More