Headlines

मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे:विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते…

Read More

अस्थमा नियंत्रणासाठी 'ॲक्शन प्लॅन' महत्त्वाचा:भारतात 3.5 कोटी लोकांना दम्याचा त्रास, 'कंट्रोलर इनहेलर्स'चा नियमित वापर करा- तज्ज्ञ

दमा (अस्थमा) हा केवळ तात्पुरता त्रास नसून, श्वसनमार्गातील सूज (इन्फ्लेमेशन) हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ खोकला किंवा श्वास लागणे यांसारखी तात्पुरती लक्षणे कमी करण्याऐवजी श्वसनमार्गातील सूज नियंत्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. रुग्णांनी तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ…

Read More

Mothegaonkar Plants NTA Panel; NEET Paper Leak from Delhi HQ?

देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या गोपनीयतेचे धिंडवडे खुद्द राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) दिल्लीतील मुख्य कार्यालयातच उडाले असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. एनटीएने अत्यंत विश्वासाने नेमलेल्या काही ‘अनुभवी तज्ज . नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (NTA) अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेला ‘सुरुंग’ लावून नीटचा (NEET 2026) पेपर कसा फोडण्यात आला, याचा अंगावर काटा आणणारा…

Read More

भाजपचे लोक ज्यांना देव मानतात, ते प्रश्नांना घाबरतात का?:मोदी केवळ फिरण्यासाठी परदेशात जातात; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 देशाचा दौरा केला. तिकडच्या पत्रकारांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे सोडून तुम्ही पळून का जात आहात? नार्वेमधील पत्रकाराने प्रश्न विचारला आणि मोदी पळताना दिसले हे चित्र भारताच्या लोकशाहीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र…

Read More

चिखली शिवारात दुचाकीस्वाराकडून गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त:परभणीच्या तरुणाला वसमतमध्ये अटक

वसमत तालुक्यातील चिखली शिवारात दुचाकीस्वाराच्या तपासणीमध्ये एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडले असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील मानवत येथील सुरजितसिंह टाक (26) हा नांदेड येथून दुचाकी वाहनावर परभणीकडे जात असून त्याच्या कपड्याच्या पिशवीमध्ये गावठी…

Read More

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎

तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची…

Read More

माता सीतेच्या गोष्टीमध्ये रमले अहिल्यानगरचे रसिक:अनुभव संपन्न, कसदार वाचिक अभिनयातून उलगडले सीतेच्या जगण्याचे भावविश्व‎

रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आय . वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या…

Read More

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची…

Read More

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:" माय वसुधा विकास'' ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा कार्यासाठी सुरू केली असून, या अंतर्गत संस्थेने ११०० ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, मठ्ठाचे पेले, नाष्टा प्लेट निःशुल्क उपलब्ध झाले आहेत. फक्त न्या, वापरा…

Read More

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर

“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते, असे प्रतिपादन गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले….

Read More