दुर्दैवी घटना:घटनेनंतर कोवळ्या बाळांना घेऊन बाळंतिणींची रुग्णालयाबाहेर धाव, पहाटेपासूनच जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात नातेवाइकांचा आक्रोश
आग लागल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील बाळांतीण रुग्ण आपल्या कोवळ्या बाळांसह आणि नातेवाईकांसह सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर आल्या. यावेळी महिला ओपीडी परिसरात थांबल्या, तर अनेकांनी थेट रुग्णालयाच्या बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले. . जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ अमरावती शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील महिला रुग्णही उपचारासाठी येतात. त्यामुळे पहाटेच्या या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी…