सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ‘काल्पनिक वेतनवाढी’ला न्यायालयीन बळ:ॲड. शिवकुमार मठपती यांचा देवगड येथे सत्कार
जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यानंतरची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मिळालेली ही काल्पनिक वेतनवाढ हे न्यायालयीन यश असून, भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे अॅड. शिवकुमार मठपती यांनी सांगितले. या न्यायालयीन लढ्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने…