Headlines

गणपती मिरवणुकीत अंडी फेकण्याचा प्रकार यापूर्वी कधीच नाही:आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरूनही भ्रष्टाचाराचा आरोप

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची निकृष्ट दर्जाची कामे, मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याची घटना आणि राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण…

Read More

संभाजीनगरातील पारसोड्यात अवतरली पंढरी!:संत बहिणाबाई महाराज सप्ताहाची सांगता; काल्याच्या कीर्तनासाठी लोटला 50 हजार भाविकांचा जनसागर

वैजापूर तालुक्यातील पारसोडा येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी (२५ ऑगस्ट) भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ह.भ.प. मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. सांगता सोहळ्यासाठी तब्बल ५० हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याने पारसोडा नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘देव प्रेमाने बांधला जातो, संपत्तीने नाही’…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली:वसतिगृहाची वयोमर्यादा रद्द, तरीही अन्य मागण्यांसाठी लढा सुरू

मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे 40 मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी अधिक तीव्र झाले. आंदोलनाच्या १२ व्या दिवसापर्यंत चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांसाठीची ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द केली असली, तरी अन्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे….

Read More

समाविष्ट गावांच्या वाढीव कराविरोधात विरोधक आक्रमक:विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे आश्वासन

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांवर लावण्यात आलेल्या वाढीव कराविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र आंदोलन केले. हा वाढीव कर तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाविष्ट गावातील नागरिक आधीच अनेक समस्यांनी त्रस्त असताना त्यांच्यावर वाढीव कराचा अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात…

Read More

रक्षाबंधनासाठी कैद्यांच्या हातून साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन:डॉ. सुहास वारके म्हणाले- कारागृह हे सुधारगृह, शिक्षेचे ठिकाण नाही

बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “रक्षाबंधन” सणाचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. “कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह आहे. बंदींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध…

Read More

मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टने केले शैक्षणिक सहकार्य करार:विद्या प्रतिष्ठान आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटरसोबत संशोधन उपक्रम राबवणार

मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टने (MMMT) शैक्षणिक आणि संशोधन सहकार्यासाठी दोन महत्त्वाचे करार केले आहेत. यामध्ये विद्या प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (बारामती) यांच्याशी एक करार, तर मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात दुसरा करार समाविष्ट आहे. हे करार संयुक्त कार्यशाळा, संशोधन…

Read More

शिवाजी विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर:अमरावतीच्या प्रभा गणोरकर आणि छत्रपती संभाजीनगरचे रवी कोरडे यांचा कोल्हापूरमध्ये होणार सन्मान

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांना तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ रवी कोरडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नियतकालिकांच्या संपादन व लघुनियतकालिक चळवळीत सक्रीय सहभाग असणाऱ्या सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाजी विद्यापीठात लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी…

Read More

CISCE SHINE 2026 Scheme; Digital Assessment for Classes 4, 6 and 9

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (CISCE) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सर्वांगीण मूल्यमापन करण्यासाठी ‘SHINE 2026’ ही डिजिटल मूल्यांकन योजना सुरू केली आहे. SHINE म्हणजे ‘स्टुडंट होलिस्टिक इनसाइट अँड नर्चरिंग इव्हॅल्युएशन’ य . SHINE 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 21 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. केवळ वार्षिक परीक्षांच्या निकालावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता, त्यांच्या शिकण्याची स्थिती विविध…

Read More

नितीन गडकरी म्हणाले- आता जास्त काम करू शकत नाही:नवीन पिढीला जबाबदारी सोपवावी; नागपूरमधील कार्यक्रमात केले विधान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, ते पूर्वीइतके काम करू शकत नाहीत आणि आता जबाबदारी नवीन पिढीच्या हाती सोपवली पाहिजे. नागपूर येथील ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग’ कार्यक्रमात गडकरींनी हे विधान केले. गडकरींच्या या विधानानंतर महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा राजकीय वर्तुळात…

Read More

अंगणवाडी निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारीनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये:48 तासांत सर्व केंद्रांची तपासणी, आदिती तटकरेंचा कडक इशारा

अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेने पोषण आहारासाठी मिळणारा पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष म्हणजे, निकृष्ट आहाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या संबंधित अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका…

Read More