Headlines

A migrant rickshaw driver brutally beat up a Marathi driver in Mumbai, he hasn’t learned in 36 years, learn now; We will break the curse

रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईत वातावरण तापले असून कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला परप्रांतीय चालकांकडून बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मारहाण करणाऱ्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधी . हिंदुस्तान नाक्याजवळ काही अमराठी रिक्षाचालकांनी मराठी सक्तीविरोधात चक्काजाम आंदोलनाचा प्रयत्न केला. या वेळी भाडे घेऊन जाणाऱ्या प्रकाश बंडू शेजवळ या मराठी रिक्षाचालकाला आंदोलकांनी…

Read More

नवी मुंबईत दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश:4,710 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, लाखोंचा मुद्देमाल जप्त, 15 जणांवर गुन्हा

नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या प्रकारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. १९ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध नष्ट करण्यात आले. याशिवाय पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि क्रीमसह लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात १५ व्यक्ती आणि संबंधित…

Read More

शेवंती लागवड व संवर्धन कार्यशाळा:श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात यशस्वी आयोजन

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने “शेवंती लागवड व संवर्धन” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अमरावती गार्डन क्लब आणि अमरावती हौशी बाग यांच्या समन्वयातून आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक, बागकामप्रेमी आणि शेवंती उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. संगीता इंगोले होत्या. मंचावर अमरावती गार्डन क्लबचे…

Read More

शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन

कोरोना महामारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची वाढलेली अनुपस्थिती चिंताजनक आहे. पारंपरिक घोकमपट्टीऐवजी अध्यापनात आधुनिक बदल स्वीकारण्याची गरज असून, परीक्षा पद्धतीतील शिथिलता आणि विना-अनुदानित संस्थांचा वाढता प्रभाव यामुळे शिक्षण क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. या बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग आणि संघटनांनी संघटित राहून प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन प्रा. एस.पी. लवांडे यांनी केले. नागपूर…

Read More

रक्षाबंधनासाठी टपाल विभाग सज्ज:रेल्वे स्थानकात अतिरिक्त काउंटर, नागरिकांची पसंती टपाल सेवेलाच

रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावंडांमधील प्रेमाचा धागा वेळेत पोहोचवण्यासाठी टपाल विभागाने तयारी केली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी अमरावती रेल्वे स्थानकातील टपाल सेवा केंद्रात एक अतिरिक्त काउंटर उघडण्यात आले आहे. हे काउंटर आगामी २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहील, अशी माहिती उपअभिलेख अधिकारी प्रकाश हागे यांनी दिली. सध्या टपाल मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयांमध्ये…

Read More

FDA ची राज्यभर धडक कारवाई:मुंबई क्रिकेट असोसिएशनसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित, 45 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमवर कारवाई मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या…

Read More

पीएमपीएमएल बस अपघातात मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई मिळणार:मृत्यू झाल्यास 3 लाख, जखमींना 1 लाख, नवीन धोरण लागू

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बस अपघातात होणाऱ्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसाठी प्रथमच भरपाई देण्याचे धोरण निश्चित केले आहे. याशिवाय, अपघातात मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना मिळणारी आर्थिक मदत दोन लाखांवरून तीन लाख रुपये, तर जखमींसाठीची मदत पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या…

Read More

काँग्रेस आणि मविआकडून महिला आरक्षणावरून बुद्धीभेद:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, महिला आरक्षण, अमरावती आग प्रकरण आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी 7…

Read More

पुण्यात राजपूत महिलांचा ‘सावन मिलन’ सोहळा उत्साहात:क्षत्राणी सन्मान सोहळ्यात महापौर नागपुरेंकडून शौर्य-त्यागाच्या परंपरेचे कौतुक

पुणे येथे समस्त राजपूत महिला संघातर्फे आयोजित सावन मिलन कार्यक्रमात ‘क्षत्राणी सन्मान सोहळा’ पार पडला. यावेळी महापौर मंजुषा नागपूरे यांनी राजपूत महिलांच्या शौर्य, त्याग, देशभक्ती आणि संस्कारांच्या परंपरेचे कौतुक केले. आधुनिक काळातील राजपूत महिला शिक्षण, समाजसेवा, व्यापार आणि राजकारण यासह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता…

Read More

नागपुरातील गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती:56 जण बाधित, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

नागपूरजवळील गोधनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषद अंतर्गत असलेल्या वॉटर ट्रिटमेंट प्लांटमध्ये आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली. ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलिंडरमधून ही गळती सुरू झाली, ज्यामुळे आजूबाजूच्या वस्तीत गॅस पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे ५६ नागरिक बाधित झाले असून, त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास…

Read More