सांजूळ प्रकल्पावरील 107 अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित:पिण्यासाठी पाणी आरक्षित, महसूल, महावितरण प्रशासनाची कारवाई
फुलंब्री शहरासह ग्रामीण भागाचा मुख्य आधार असलेल्या सांजूळ लघु प्रकल्पातील पाणीसाठा खालावत चालल्याने आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोहीम राबवून प्रकल्पाच्या आरक्षित जलसाठ्यातून सुरू असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी १०७ अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा रविवारी खंडित केला आहे. सांजूळ प्रकल्पातील अनधिकृत उपशाबाबत नागरिकांच्या तक्रारींनंतर महसूल, पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन,…