![]()
बोरवंड रस्त्यावरील उमरीफाट्याजवळ रस्त्यावर उभ्याअसणाऱ्या टिप्परवर कार मागून आदळली. शनिवारी (१०ऑक्टोबर) रात्रीच्या या अपघातात रोहित दिलीपराव शेळके (३८) आणि माधवी रोहित शेळके (३५)या दांपत्याचा मृत्यू झाला. ते ब्रह्मपुरी (ता.परभणी) येथे सासरवाडीला गेले होते. तेथून परत येताना हा अपघात झाला. अपघातात रितीक्षा शेळके (११) ही चिमुकली गंभीर जखमी झाली . परभणी येथील गांधी पार्कातील रहिवासी शेळके दांपत्य मुलगी रितीक्षासह ब्रह्मपुरीला गेले होते. तेथून ते कारने परत येत होते. उमरी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परवर (यूपी-८५सीपी-५४६२) कार (एमएच-२२एच २९६१) मागून धडकली. या अपघातात कारच्या समोरील सीटवर बसलेल्या शेळके दांपत्याचा मृत्यू झाला. तर मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली. रोहित यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांचा शहरात हॉटेलचा व्यवसाय आहे. रोहित यांच्या पश्चात दोन मुली, भाऊ,वहिनी व आई असा परिवार आहे. जखमी रितीक्षाने मामाला फोन करून दिली माहिती शेळके दांपत्य कारच्या पुढील सीटवर बसले होते. त्यामुळे दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मागील सीटवर बसलेली रितीक्षा जखमी झाली. त्या अवस्थेतही रितीक्षाने प्रसंगावधान राखून वडिलांच्या फोनवरून मामाला फोन केला, तसेच अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तिचे मामा व त्यांचे मित्र अपघातस्थळी आले. त्यांनी रितीक्षाला दवाखान्यात नेले. रितीक्षाची दुसरी बहीण घरीच असल्याने बचावली.
Source link
उभ्या टिप्परवर कार मागूनधडकली; दांपत्याचा मृत्यू:सासरवाडीतून परतताना काळाची झडप