Headlines

भास्कर कुलकर्णी यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार:आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरलाही आदर्श शाळा पुरस्कार‎




शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उपक्रमशीलता आणि सर्वांगीण विकासातील योगदानाबद्दल आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठणचे मुख्याध्यापक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिराला आदर्श शाळा आणि शिक्षक चळवळीत सक्रिय असणारे विनोद सरोदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्विफ्ट अँड लिफ्ट फाउंडेशन, पुणे आयोजित सोहळ्यात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या बहुमानाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, उपाध्यक्ष ज्योती ठाकूर, विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, संकुलाचे पालक उमेश जगताप, स्था. व्य. समिती अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, प्रा. शा. समिती अध्यक्ष शिवाजी मारवाडी, मा. शा. समिती अध्यक्ष नंदकिशोर मालाणी, विजय चाटुपळे, डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल, किशोर भाकरे, विजय पापडीवाल, दत्तात्रय पोहेकर, रविंद्र साळजोशी, मुख्याध्यापिका ज्योती जोशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *