![]()
अडलेल्या, नडलेल्या आणि गरजू मनुष्याला अन्न, वस्त्र, दान व सन्मान देणे हाच खरा नीतिधर्म आहे. आयुष्यात संतांची संगत आणि ग्रंथांचे पठण आवर्जून करा, त्यामुळे जीवनाला निश्चितच योग्य आकार मिळतो, असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री श्री १००८ शनिभक्त सुखदेव महाराज यांनी केले. शनि अमावस्येनिमित्त नेवपूर-वाकी येथील श्रीक्षेत्र शनैश्वर देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी आरती झाल्यानंतर दुपारी १० ते १ या वेळेत ५१ कुंडीय नवग्रहशांती यज्ञ सोहळा सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या यज्ञाचा १०० हून अधिक भाविकांनी प्रत्यक्ष बसून लाभ घेतला. यावेळी गुजरात येथील उद्योजक विठ्ठल खरात, उदयसिंह घोरपडे, विलासराव निकम, राजू ठवरे, चंद्रकांत राजूरकर, माजी सरपंच गणेश निकम, अर्जुन सोनवणे आणि दत्ता काटे यांच्या वतीने महाराजांना शनि महाराजांचे शस्त्र असलेला नवीन राजदंड भेट देण्यात आला. या धार्मिक सोहळ्यास माजी आमदार उदयसिंग राजपूत, नाशिकचे माजी महापौर सुनील बागूल, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, प्रेम पाटील, सुरेश कळमकर, स्वाती कोल्हे, भारत ढेपले, रमेश शेळके, कावेरी पठाडे, प्रकाश मोरे, सरपंच दिनकर खरात, सुखदेव हराळ, उद्योजक तेजराव खरात, राजू पवार, नवाब शेख, प्रल्हाद राजपूत, राहुल चव्हाण, सुनील निकम, कैलास भोसले, सुनील कळमकर, विनोद जोशी, लहानू मेमाणे, भास्कर बोचरे, विजय काटकर, दौलत खाडे, सचिन गव्हाणे, दिलीप कदम, भाऊसाहेब चौधरी, रंगनाथ दाते, अमृतराव सांगळे, अंकुश धोंडकर, शंकरराव दवंगे, सुनील पाटील, वसंत जाधव, निलेश करपे, ऋषिकेश घोडके, राज जाधव, सुनील ढवण, भरत सुडके, बळीराम धोंडकर, राम धोंडकर, सारंग काटकर, सनी बोचरे, सत्यम बोचरे, एकनाथ चौधरी, पुंडलिक ठाकरे व शिवाजी गोरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Source link
गरजूंना मदत करणे खरा नीतिधर्म- सुखदेव महाराज:नेवपूर-वाकी येथील शनेश्वर देवस्थानमध्ये कार्यक्रम