![]()
कन्नड तालुक्यातील सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या उपकेंद्रामधील डॉक्टर्स, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रुग्णांची तप
.
याबाबत राज्याचे आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांच्याकडे कृषिभूषण डॉ. सीताराम जाधव, दामू राठोड, एकनाथ हिरा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ.तृप्ती राजपूत, डॉ.संजय गव्हाणे, डॉ. दिलीपसिंग राजपूत आदींची निवेदन सादर करून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या उपकेंद्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण व दयनीय झाली आहे, तर गरोदर महिलांना लसीकरण अंगणवाडी इमारतीत करावे लागत आहे. इमारतीच्या भिंतींना भेगा पडलेल्या असून प्लास्टर निघून पडले आहे. छताचीही अवस्था खराब असून इमारतीवर गवत व झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे ही इमारत नागरिकांसाठी धोकादायक बनली आहे. गावातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत प्रश्न असून, अनेक वर्षांपासून उपकेंद्र बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब झाली आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य उपकेंद्र तातडीने सुरू करावे. निवासी डॉक्टर व आवश्यक आरोग्य कर्मचारी नियमित उपलब्ध करून द्यावेत. जीर्ण इमारतीची तातडीने सहा जणांचा स्टाफ असूनदेखील जीर्ण इमारतीमुळे बसता येत नाही. मी गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी येण्या पूर्वीपासून आरोग्य उपकेंद्र इमारत मोडकळीस आलेली आहे. भिंत खचलेली आहे. आठ वर्षांपासून इमारतीची दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी सहा जणांचा स्टाफ आहे, पण या इमारतीत बसू शकत नाही. ओपीडीत मोठ्या संख्येने रुग्ण येतात. ग्रामपंचायतीसमोर रुग्णांची तपासणी करावी लागते. वरिष्ठ कार्यालयाकडे इमारतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. -डॉ. प्रतीक्षा धुरे, वैद्यकीय अधिकारी, सावरगाव आरोग्य उपकेंद्र
कन्नड तालुक्यातील सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची झालेली दुरवस्था. पाहणी व स्ट्रक्चरल ऑडिट करावे. आवश्यक असल्यास नवीन इमारत बांधण्याची कार्यवाही करावी. तोपर्यंत नागरिकांसाठी पर्यायी आरोग्य सेवेचे ठिकाण उपलब्ध करून द्यावे. सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. इमारत पाडून नव्याने बांधावी लागणार Ãही आरोग्य उपकेंद्राची इ मारत दुरुस्तीच्या पलीकडे गेली आहे. ती पाडून नव्याने बांधावी लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीला विनंती करून ओपीडीसाठी एक खोली मिळवली आहे. आमदार संजना जाधव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्या स्वेच्छा निधीतून ही इमारत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनाही इमारतीसाठी प्रस्ताव दिला आहे . लवकरात लवकर आरोग्य उपकेंद्रास ईमारत उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. -डॉ. योगेश सोळंके, तालुका आरोग्य अधिकारी, कन्नड प्रतिनिधी