Headlines

राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा:सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू, CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच युवक आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष व इंडिया आघाडीने देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर इंडिया आघाडीने मोर्चा काढला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

MPSC Inquiry Authority & Rohit Pawar Controversy

“पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार रोहित पवार यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि पुनर्वसनासाठी हे आंदोलन उभे केले होते. एमपीएससी ही संविधानाने निर्माण केलेली स्वायत्त संस्था आहे. संविधानाच्या कलम 317 . रोहित, छात्र तुम्हारी खेती नही…; वात्रटिका सादर करत पवारांवर प्रहार रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवर सडकून टीका करताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले,…

Read More

आणीबाणी असती तर संजय राऊत तुरुंगात असते की बाहेर?:भारताला बांगलादेश आणि नेपाळ बनवण्याचा 'तुकडे तुकडे गँग'चा डाव! -आमदार नीलेश राणेंची टीका

“केवळ तोंडाने वाफा सोडणे आणि पोकळ भाषणबाजी करणे यापलीकडे ठाकरे गटाकडे काहीही उरलेले नाही. गेल्या 10 वर्षांत त्यांनी केलेल्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला होता. आता महायुती सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लागत असल्याने उबाठामधून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिन्याला दोन ते तीन मोठे प्रवेश आमच्याकडे होत असून, सरपंच, उपसरपंचांसह संपूर्ण स्थानिक कार्यकारिणी शिवसेना शिंदे गटात…

Read More

सोयाबीन मळणी यंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू;:कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी

माहूर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी संदीप आत्माराम कऱ्हाळे (वय 34) यांचा साकूर शिवारात सोयाबीन मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली. संदीप कऱ्हाळे हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते रोजंदारीने साकूर शिवारातील एका शेतात सोयाबीन काढण्याच्या कामासाठी मळणी यंत्रावर गेले होते. मळणी यंत्र सुरू असताना अचानक त्यांचा झोक जाऊन ते…

Read More

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 21 लाख 20 हजार रुपये लांबवले; चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची 21 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली, तर दुसऱ्या डॉक्टर महिलेचे 74 हजार रुपये लांबवले. ओैंधमधील 39 वर्षीय महिलेला चोरट्यांनी मोबाईलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीचे संदेश पाठवले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका बँक खात्यात महिनाभरात 21 लाख 20…

Read More

Abhijeet Dipke Targets Delhi Police Over Harassment Allegations

“जोपर्यंत नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीचा अंत होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरू,” असा थेट इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर माध्यमांशी संवा . महिला पोलिसांचा ढाल म्हणून वापर अटकेच्यावेळी महिला पोलिसांना पुढे करण्याच्या पोलिसांच्या रणनीतीवर दिपके यांनी टीका केली. ते म्हणाले, “पुरुष…

Read More

दुष्काळाच्या सावटाखाली मूर्तिजापूर तालुक्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात:नऊ दिवसांचे उपवास आणि जागरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन ‎

एकीकडे तालुक्यात दुष्काळ असतानाच दुसरीकडे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांचे नुकसान, पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची आर्थिक चिंता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भाविकांची देवीवरील श्रद्धा कायम आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवींची स्थापना, विधिवत घटस्थापना, नऊ दिवसांचे उपवास, पूजा, आरती, जागरणातून आदिशक्तीची आराधना केली जात आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण…

Read More

अकोटमध्ये 73 नवदुर्गा, 19 शारदा मंडळांची स्थापना:रंगरंगोटी अन् आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला‎

अकोट शहरात रविवारी नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त शहरात ७३ नवदुर्गा मंडळे, तर १९ शारदा मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान शहरातील विविध देवी मंदिरांसह सार्वजनिक नवरात्र मंडळांच्यावतीने घटस्थापना करण्यात आली. दररोज भजन, कीर्तन, यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत…

Read More

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक:आज राज्यभर स्वाक्षरी मोहीम, राज ठाकरे शिवाजी पार्कवर लावणार हजेरी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेकडून आज राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची उपस्थिती या मोहिमेबाबत माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले…

Read More

40 दिवसांत 8.77 टीएमसी उपसा:आजपासून उजनीचे पाणी शेतीस बंद, ऊस, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात‎

यावर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके आधीच पूर्णपणे करपली असून, आता रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर, उजनी धरणातील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणीसाठा ८३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे उद्यापासून…

Read More