शरद पवार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कसरतीचे धडे:घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजीसह कराटे आणि ट्रेकिंगचेही प्रशिक्षण
व्यक्तिमत्त्व चांगले करायचे असेल तर सुट्ट्यांचा सदुपयोग करायलाच हवा, या संकल्पनेतून शंभर विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजी, कराटे, ट्रेकिंग आणि व्यायाम तसेच खेळाच्या माध्यमातून आपल्या सुट्टीचा वेळ घालवून प्रशिक्षण पूर्ण केले. निमित्त होते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे. येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलने संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांच्या संकल्पनेतून…