Headlines

अमरावतीत एमडी ड्रग्जची पुन्हा मोठी कारवाई:विलास नगरमध्ये ४.०५ लाखांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील साहूबाग-विलास नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इलियासअली मेहबूब अली (वय ४०, रा. अन्सारनगर, वाडी गवळीपुरा, अमरावती) या आरोपीला…

Read More

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

Read More

अमरावती विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या नवीन इमारतीचा कार्यारंभ:बुलढाणा येथे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नवीन इमारतीचा कार्यारंभ आज, गुरुवार, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. या सोहळ्याला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याच्या युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा विशेष कार्यक्रम मॉडेल डिग्री कॉलेज परिसर, अजिंठा रोड, ग्राम-बिरसिंगपूर,…

Read More

बंद रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला:हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू

अमरावती येथील पठाण चौक परिसरात एका बंद रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. बुधवारी, १३ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वजीर पटेल यांच्या संस्थेद्वारे चालवले जाणारे हे रुग्णालय अनेक दिवसांपासून बंद होते. गेल्या काही…

Read More

पुण्यात तरुणीच्या प्रियकराकडून आईच्या प्रियकराचा खून:प्रेमसंबंधांच्या वादातून काळेपडळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली

पुण्यात प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणीच्या प्रियकराने तिच्या आईच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी मृत व्यक्तीने टाकलेल्या दबावामुळे हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश संजू…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई:नामकर्ण आवारेला अटक, खरातच्या कबुलीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणी सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली…

Read More

नागपूर विमानतळाचा कायापालट होणार:केंद्र सरकारकडून 'जीएमआर'ला हिरवा कंदील; 30 वर्षांसाठी खासगीकरणाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विमानतळ विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून, ‘जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’ (GNIAL) कडे…

Read More

खासगी ट्रॅव्हल्सची लूट थांबणार!:बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी विशेष समिती; परिवहन मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यात खासगी प्रवासी बस वाहतुकीदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून तक्रारी येत आहेत. याबाबत आता शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे…

Read More

सखोल अभ्यासाअभावी ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित:‘इतिहासातील भुतावळ’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मोडी लिपी तज्ज्ञांचे मत

सखोल अभ्यासाअभावी आजही हजारो ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित आहेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक आणि मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी व्यक्त केले. इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या ‘इतिहासातील भुतावळ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तो चारही बाजूंनी पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज सखोल अभ्यासाची तयारी…

Read More

संभाजीनगरच्या पाणीटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पाणी वितरण सुरळीत करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; अंबादास दानवेंचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात फक्त 15 ते 16 वेळाच पाणीपुरवठा झाला…

Read More