राष्ट्रवादीत पवार कुटुंबाचे वर्चस्व!:पक्षाच्या तिजोरीवर आता पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांचे नियंत्रण; तटकरे-पटेलांचा पत्ता कट?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या…