Headlines

रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे….

Read More

पोलिस दलास 3 आधुनिक सर्व्हिलन्स वाहने:कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे आता हाेणार शक्य‎

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ३ सर्व्हिलन्स वाहने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांचा शुभारंभ ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या सर्व्हिलन्स वाहनांच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रभावी…

Read More

भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू:लातूर-अंबाजोगाई मार्गावर दुर्घटना; तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात…

Read More

शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे….

Read More

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद' सर्वांना लागू करा- संजय राऊत

नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू…

Read More

रब्बीच्या ई पीक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम जिल्ह्यात अव्वल:42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टर क्षेत्रावरील पाहणी पूर्ण, तहसीलदार शारदा दळवीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र…

Read More

Congress May Withdraw, Unopposed Polls Likely

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब . काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज…

Read More

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार:हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या…

Read More

स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारने दिलेली नाही:जनतेने बहाल केली असावी, पण कोणताही अधिकृत पुरावा नाही- सात्यकी सावरकर

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली. या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली. उलटतपासणीदरम्यान, सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दावे मान्य केले. त्यांनी कबूल केले की, स्वातंत्र्यवीर…

Read More

प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख खंडणी उकळली:पोलिस उपनिरीक्षक, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यात एका धक्कादायक घटनेत, प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ सोनाली…

Read More