Headlines

शासनाचा तरुणांच्या आयुष्याशी खेळ!:पोलिस भरतीच्या पेपर प्रकरणावरून रोहिणी खडसेंची टीका; कामचुकारपणा की तोडपाणी?- रोहित पवार

महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील असल्याचे समोर आले आहे. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी…

Read More

पुण्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअपला कंटेनरची धडक, एक गंभीर जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने २२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल पिगारासमोर घडला. टाटा आयशर कंटेनर (एम एच 04 एम एच…

Read More

पोलिस भरती, सरळसेवा परीक्षा अनिश्चित:लाखो तरुण चिंतेत; मंत्र्यांच्या आश्वासनांमुळे विद्यार्थी समन्वय समितीची वार्षिक कॅलेंडरची मागणी

महाराष्ट्र राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सध्या पोलिस भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांच्या अनिश्चिततेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाच्या नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धर्तीवर या परीक्षांचेही वार्षिक कॅलेंडर (वेळापत्रक) तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी ‘विद्यार्थी समन्वय समिती’ने केली आहे. विद्यार्थी समन्वय समितीचे प्रतिनिधी विठ्ठल बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

मोदींनी ममतांना पराभवाची झालमुडी चाखवली:बंगाली जनतेने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली; शिंदेंनी केले मोदी – शहांचे कौतुक

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. आज भाजपसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण, आज पहिल्यांदाच बंगालमध्ये कमळ उमलले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली, असे ते म्हणालेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा…

Read More

मेधा कुलकर्णी संसदेत मांडणार 'कॉर्पोरेट जिहाद' मुद्दा:कंपन्यांसाठी नियम-अटी करणार; 'लव्ह जिहाद' विरोधात अभियानास प्रारंभ

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा आगामी संसदेत मांडणार असल्याचे सांगितले. कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये वाढता जिहाद रोखण्यासाठी भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर नियम-अटी लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाचा प्रारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. कुलकर्णी…

Read More

Sunetra Pawar Breaks Ajit Pawars 2019 Record in Baramati

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय झाला आहे. 24 व्या फेरीअंती सुनेत्रा पवार यांचा 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना आव् . बारामती विधानसभेसाठी गत 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा…

Read More

विरोधक डरपोक, बहाणेबाज व रडणारे लोक:मंत्री आशिष शेलार यांचा टोला; ठाकरे गटासोबत गेलेल्या सर्वांचा पराभव झाल्याचा दावा

भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधक हे डरपोक, बहाणेबाज व रडके लोक आहेत. त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही. त्यामुळे मी त्यांचे नाव रडके असे ठेवतो. त्यांना थोडी जरी अक्कल असेल, तर त्यांनी आत्मचिंतन करावे, असे ते म्हणालेत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत…

Read More

गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात:अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक; 3 ठार, अनेक जखमी

गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. हा अपघात रुद्देवाडी बस स्टॉपजवळ झाला असून, धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सुमारे 25 ते…

Read More

क्यूआर कोडद्वारे आता पाेलिसात करा तक्रार‎:‘मुलींची सुरक्षा'' प्रणाली मूर्तिजापूर येथून प्रारंभ; ओळख राहणार गोपनीय‎

प्रतिनिधी | मूर्तिजापूर महिला, युवती व मुली यांना अन्याय, अत्याचार, त्रास देणे, पाठलाग करणे अशा अनेक अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागते. परंतु त्या भीतीपोटी किंवा पालक शिक्षण अपूर्ण राहू देतात अथवा नसती कटकट नको म्हणून याबाबत तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक असामाजिक समाजकंटक आणि नराधम यांची हिंमत वाढते व नको त्या घटना घडत असतात. या…

Read More

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल:जनतेने कर्डिले साहेबांप्रतीची भावना मतातून व्यक्त केली, अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी १२ व्या फेरीअखेर ५०,२७३ मतांची दणदणीत आघाडी घेऊन विजयाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. या यशाचे कल स्पष्ट होताच कर्डिले यांनी आपली पहिली भावनिक प्रतिक्रिया दिली असून, हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या वडिलांप्रती, म्हणजेच ‘कर्डिले साहेबां’प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले…

Read More