Headlines

जमिनीचे ‘एनए’ करण्यासाठी आता ऑनलाइन प्रणाली सुरू:हेलपाटे वाचणार, महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन

राज्य सरकारने अकृषिक (एनए-नॉन ॲग्रिकल्चरल) जमीन रूपांतरणाची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता जमीन ‘एनए’ करण्याचे शुल्क (प्रीमियम) ऑनलाइन भरता येणार असून, ही सुविधा ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम’शी (बीपीएमएस) जोडण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात या अद्ययावत ‘बीपीएमएस’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे बांधकाम परवानग्या आणि…

Read More

बोगस लाडक्या बहिणींकडून निम्मीवसुली, सरकारच्या दाजींना मात्र ‘सूट’:12,915 पैकी 6,457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटी वसूल

लाडकी बहीण योजनेत श्रीमंत अन् टॅक्स भरणाऱ्या महिलांसह लाडक्या दाजींनीही योजनेचा गैरफायदा घेतला होता. लाडक्या नसलेल्या या १२,७५७ दाजींनी सरकारला २२.९६ कोटी रुपयांना चंदन लावले होते. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून ५० टक्के वसुली केलीसुद्धा. पण घुसखोर दाजींनी लाटलेले २२.९६ कोटींच्या वसुलीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या नाहीये. डिसेंबर-२०२५…

Read More

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस:14 जण इच्छुक, विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना विरोध

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ इच्छुकांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण आणि…

Read More

शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधात संताप:8 दिवसांत बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचे सहायक अभियंतांना निवेदन

तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांची बदली न झाल्यास ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाहीत. वीज बिघाड झाल्यास ते फोन उचलत नाहीत किंवा त्यांचे फोन बंद असतात. यामुळे तांत्रिक अडचणी…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More

CSMT स्थानकावर दोन लोकल आमनेसामने:मोठा अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित; रेल्वे प्रशासनाची कारवाई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याची अत्यंत गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड आणि संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून ही मोठी…

Read More

अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर आणणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत मोठे विधान केले. अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे फडणवीस म्हणाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत…

Read More

1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित:प्रकृतीमुळे बारामतीला येणे अशक्य; सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित…

Read More

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही:अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही:अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक Source link

Read More

Mumbai Train Collision Averted at CSMT Station; Motormans Quick Action Saves Lives

मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरी रेल्वे सेवेत मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दुपारी सुमारे 3.18 च्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका च . मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात…

Read More