Headlines

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन:काँग्रेसच्या शिबिरात ‘कुंग-फू’ प्रात्यक्षिके दाखवणार, आदिवासी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असून काँग्रेसच्या ‘सृजन शिबिरा’चा समारोप त्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. गंगापूर धरण परिसरातील शिबिरात ते 75 जिल्हाध्यक्षांसमोर ट्रेनर रिषभ यांच्यासोबत ‘कुंग-फू’चे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आरक्षणावर राहुल गांधी यांनी…

Read More

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आजपासून शिंदे गटाचा युक्तिवाद:'धनुष्यबाण' गोठवण्याच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या हक्कावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 नंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या खटल्यात आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विशेष म्हणजे, ठाकरे…

Read More

कोर्टाच्या निर्णयापर्यंत पीओपी मूर्तींवर मागील बाजूला लाल खूण अनिवार्य:राज्य सरकारचे सर्व स्थानिक संस्थांना आदेश, शासन निर्णय जारी

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनाबाबत मुंबई हायकोर्टात सुरू याचिकांवर अंतिम निकाल येईपर्यंत राज्यातील १ ऑगस्ट २०२५ चे सुधारित मार्गदर्शक नियमच लागू राहतील, असा शासन निर्णय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंगळवारी जारी केला. यामुळे यंदाच्या व पुढील सणासुदीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विसर्जनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. कोर्टाच्या जनहित याचिकेतील अंतरिम आदेशांनुसार…

Read More

‘ओम साई नमो नमः’चा गजर अन् ‘हर हर महादेव’चा जयघोष!:‘12 ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रा’ काशीत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत साई पालखीची शोभायात्रा‎

साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रे’चे सोमवारी (३१ ऑगस्ट) पवित्र वाराणसी नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. साईंची पालखी हजारो भाविकांसह काशीत दाखल होताच परिसर ‘ओम साई नमो नमः, जय जय . यात्रा काशीत पोहोचताच स्थानिक साईभक्त राजेश अरोरा यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साई पालखीची विधिवत महाआरती करण्यात आली….

Read More

दु:ख घेऊन आले… उपचाराची आशा घेऊन परतले!:प्लास्टिक सर्जरी शिबिरात 80 रुग्णांची तपासणी; बोथरा परिवाराचा सेवाभावी पुढाकार‎

चेहऱ्यावरील व्रण, जन्मजात व्यंग, जुनाट जखमा तसेच विविध शारीरिक समस्यांमुळे त्रस्त रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिर आशेचा किरण ठरले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय वैशाली सुबोध बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा ग्रुप व बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित या शिबिरात ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन उद्योजक सुवालाल बोथरा, विनोद…

Read More

दहिटणेतून अंतरवलीकडे मराठा बांधव रवाना:मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठिंब्यासाठी पाच वाहनांचा ताफा, आणखी युवक जाणार भेटीला‎

बार्शी तालुक्यातील दहिटणे येथून संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी मराठा बांधव चार-पाच वाहनांमधून अंतरवली सराटीकडे रवाना झाले. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच उपोषणस्थळी उपस्थित राहून त्यांची भेट घेण्याच्या उद्देशाने गावातील कार्यकर्ते व समाजबांधवांनी हा प्रवास सुरू केला. दहिटणे येथून रवाना झालेल्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू…

Read More

अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला नेतृत्वावर केले प्रबोधन:नांदुरा येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ‎

महिलांचा सामाजिक, सार्वजनिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासोबतच गावातील विविध प्रश्नांवर महिलांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, या उद्देशाने नांदुरा (ता.अमरावती) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन, महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन नांदुरा सरपंच भाग्यश्री किरकटे यांच्या हस्ते…

Read More

पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करु द्या; स्मार्ट मीटर हद्दपार करा:बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन‎

पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या, स्मार्ट मीटरला हद्दपार कर, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अनेक फेरीवाले, पथविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला, फळे विकून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. मात्र त्यांच्यावर अतिक्रमण विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून रोज कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली…

Read More

खेळातून मिळतात शिस्त, समर्पण, नेतृत्वासह संघ भावनेचे धडे- बछेर:बिर्ला कॉलनीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा‎

बिर्ला कॉलनीच्या परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. विदर्भ कॅरम असोसिएशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंग बछेर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. “खेळ केवळ शारीरिक सुदृढता देत नाही, तर…

Read More

संतप्त मराठा आंदाेलकांचा टायर पेटवून जालना, बीडला रास्ता राेकाे:उपोषणाचा चौथा दिवस, मंत्र्यांची उपसमिती आंतरवालीत पोहोचलीच नसल्याने संताप, साेलापुरात मंत्री गाेरेंचा ताफा अडवला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रात्री त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे, मराठा आरक्षण उपसमिती आंतरवालीत पोहोचली नसल्याने संताप व्यक्त होत होता. दरम्यान, सोलापुरात मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा आंदोलकांनी रोखला होता. मसुदा जरांगेंकडे- विखे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे…

Read More