Headlines

2018 ला घटनादुरुस्तीने शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपले- ॲड.कौल:पक्ष-चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणे सुरू

शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मालकीवरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे) उद्धवसेनेवर थेट आणि आक्रमक हल्ला चढवला. “पक्षात अंतर्गत निवडणुका बंद करून केवळ एका सहीने पदे वाटली जात होती. २०१८ मधील घटनादुरुस्तीने सामान्य कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपवून एकाधिकारशाही आणली, असा युक्तिवाद शिवसेनेचे ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल…

Read More

‘समृद्धी’वरील लुटारूला दिल्लीमध्ये सेकंड हँड गाडी खरेदी करताना अटक:उद्योजकाला लुटणाऱ्यांपैकी दोघांना दिल्लीत तर तिघांना बीड-येवल्यातून अटक

समृद्धी महामार्गावर राहुरीच्या तरुण उद्योजकाला अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड व त्याच्या चार साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तब्बल ५ जिल्ह्यांत हवा असलेला आणि एमपीडीएमध्ये फरार असलेला परशुराम स्वतःच्या गाड्यां . लुटमारीनंतर गाड्यांच्या ॲक्सेसरीज व सेकंड हँड गाड्या खरेदी करण्यासाठी तो थेट दिल्लीच्या ऑटोमोबाइल मार्केटमध्ये पोहोचला होता, तेथेच एलसीबीने त्याच्या मुसक्या आवळल्या….

Read More

पुणे गृहनिर्माण मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता:मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) घरांसाठी उत्पन्न निकषांमध्ये शिथिलता आणली आहे. अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांना उत्पन्नाचा पुरावा…

Read More

गणेशोत्सवात यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल:पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या पुरस्कार सोहळ्यात ही अपेक्षा व्यक्त केली.

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ नवभारत विकास फाउंडेशनला दिला. ही संस्था दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय व कॅलीपर्स मोफत बसवते. याशिवाय, समाजोपयोगी काम करणाऱ्या एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वरनगर आणि अभिनव कलाभारती यांना ‘सेवाव्रत गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा स.प. महाविद्यालयाच्या लेडी…

Read More

पुण्यात डीजेवरून वाद पेटला!:विद्यानंद बापटांवर 'नक्षली'चा आरोप, गुन्हा दाखल करण्याची शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींची मागणी

पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बैठकीनंतर विद्यानंद बापट हे नाव चर्चेत आले असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण नास्तिक असल्याचे स्पष्ट करत, प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याची भूमिका बापट यांनी मांडली आहे. मात्र, त्यांच्या…

Read More

भाववाढ आणि टंचाईमुळे साखरेला ‘स्टॉक लिमीट’ लागू:साठेबाजांवर अंकुश, तपासणी सुरु झाल्याने पीडीएसची डोकेदुखी वाढली

अमरावती जिल्ह्यात वाढती महागाई आणि साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे ‘स्टॉक लिमीट’ (साठेबाजीवर अंकुश) लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची कामे वाढली असून, ठोक विक्रेत्यांकडील साठा दररोज मोजला जात आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक ठोक विक्रेत्याला एका महिन्यात ४ हजार क्विंटल साखरेची विक्री करण्याची मुभा आहे. यापेक्षा जास्त साठा आढळल्यास संबंधितांवर १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार…

Read More

शिक्षा:65 वर्षांच्या वृद्धाला तीन वर्षांचा सश्रम कारावास चिमुकलीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सहा वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज, बुधवार २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर झाला. किशोर…

Read More

नांदेड जिल्ह्यात पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’:93 सराईत गुन्हेगारांची तपासणी; 122 मपोका अन्वये दोन गुन्हे दाखल, 57 समन्स व 37 वॉरंट बजावले

नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून सराईत गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच संशयित व्यक्तींची सखोल तपासणी केली. या कारवाईत ९३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून, पाहिजे व फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १…

Read More

नैरोबीच्या महिलेला पुण्यात डॉक्टरांनी वाचवले प्राण:17व्या वर्षी 200 किलो वजन, 11 शस्त्रक्रिया आणि सेप्सिसशी झुंजल्यानंतर मिळाला ‘पुनर्जन्म’

गेल्या १५ वर्षांत तब्बल ११ शस्त्रक्रियांना सामोरे गेलेल्या नैरोबीतील एका ३२ वर्षीय महिलेचे प्राण पुण्यातील डॉक्टरांनी वाचवले. पोटातील गंभीर संसर्ग, शस्त्रक्रियेनंतर झालेला लीक, सेप्सिस आणि पोषणतत्त्वांची तीव्र कमतरता अशा गंभीर परिस्थितीत तिच्या जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, लॅपरो ओबेसो सेंटर (एलओसी), पुणे येथील बॅरिअॅट्रिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शाह…

Read More

पुणे विमानतळावर प्रवाशांकडून दररोज 12 ते 15 लाखांची अतिरिक्त वसुली:राजू शेट्टींचा आरोप; ओला-उबरसह टॅक्सीचालकांवरही अन्याय होत असल्याचा दावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या ओला, उबरसह इतर टॅक्सी वाहनांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यामुळे दररोज १२ ते १५ लाख रुपयांची जादा वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेट्टी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. दिल्लीहून रात्री दोन वाजता पुणे विमानतळावर…

Read More