रेल्वेचे प्रश्न; महाव्यवस्थापकांसोबत मंथन:अकोला- भुसावळ मार्गावरील गाड्या पूर्ववत करण्याची मागणी; चर्चेदरम्यान सुविधांवर भर
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात महाव्यवस्थापक तसेच नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांची संयुक्त बैठक पार पडली. यात जिल्ह्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक शकुंतला रेल्वे (मूर्तिजापूर-अचलपूर- यवतमाळ) ब्रॉडगेज प्रकल्पासह, अकोलामार्गे धावणाऱ्या प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पश्चिम विदर्भ व अकोला परिसरातील प्रवाशांच्या हक्काच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी,…