संचमान्यता धोरणामुळे 8 ते 10 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता:पुणे येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन; अन्यायकारक निकष रद्द करण्याची मागणी
उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित संचमान्यता धोरणाविरोधात पुणे येथे गुरुवारी शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा निषेध करत प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी यावेळी…