Headlines

“श्री नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने दुमदुमली कुंभारी नगरी:श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोप्याचा संगम; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन‎

श्रद्धेचा महासागर, भक्तीचा जागर आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देत भक्तिमय वातावरणात अकोला तालुक्यातील अतिशय प्राचीन देवस्थान असलेल्या श्री नागनाथ महाराज संस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव बुधवार, २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरा . यात्रा महोत्सवानिमित्त पहाटेपासूनच संस्थानमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली. परंपरेनुसार श्री नागनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन, अभिषेक आणि ध्वजारोहण करण्यात…

Read More

दिव्य मराठी ग्राऊंंड रिपोर्ट‎:मनपा शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. मात्र, शहरातील मनपा शाळांमध्ये याच सुविधेची कमतरता असल्याचे चित्र आहे. मनपाच्या ३१ शाळांपैकी तब्बल २६ शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा नाही. पाणी उपलब्ध असले तरी ते शुद्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ‘आरओ’साठी २०२४ मध्ये ‘डीपीडीसी’कडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणताच…

Read More

पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाची निघेल मिरवणूक:सण शांततेत करावेत, अक्कलकोट उपविभागाची शांतता समिती नियोजन बैठक उत्साहात‎

यंदाही डीजेमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सोबत उत्सव शांततेत साजरा करा. कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो. फाटे न फोडता समाजशील व्यक्ती बना. येणारे सर्वच सण शांततेत साजरे करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले . गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले….

Read More

गड-किल्ले पाहायचेच नाही, जपायचेही!; नळदुर्ग किल्ल्यावर तरुणाईचा संदेश:पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा गड-किल्ले संवर्धनाचा उपक्रम‎

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शौर्याचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देत पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) स्वच् . कार्यकर्त्यांनी हातात हॅन्ड ग्लोव्हज, झाडू, खराटे आणि कचरा संकलनासाठीच्या बॅग घेऊन किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण गोळा केली. संकलित…

Read More

अध्यात्मामुळे मानवी जीवनातील नकारात्मक विचार होतात दूर:पारायण सोहळ्याची भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता‎

धार्मिक कार्यातून मनाला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथेच परमेश्‍वराचे अस्तित्व अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने माणूस आपल्या गावापासून दूर जातो. मात्र नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरूप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्मामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असे…

Read More

पीककर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची अट रद्द करा:गुणवंत होळकर यांची राहुल गांधींकडे मागणी‎

शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळताना सिबिल स्कोअरची अट लावली जात असल्याने अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र/राज्य योजना सनियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत अशोक होळकर यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी…

Read More

शिवराईतील शिक्षण परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर मंथन:ए.आय. प्रशिक्षणासाठी पूर्वतयारीच्या सक्त सूचना‎

हतनूर कन्नड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवराई (केंद्र हतनूर) येथे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिताराम आहेर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संतोष करवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर देशपांडे यांनी शिवराई शाळेचा शैक्षणिक आढावा मांडला. परिषदेत शिक्षकांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. अतुल…

Read More

बहुलखेडा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह:सोयगाव पोलिसांकडून 3 तासांत ओळख पटवण्यात यश‎

तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील शेतात बुधवारी रात्री ४५ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी रात्रीच्या अंधारातही तपासाची चक्रे फिरवून तीन तासांत मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले दगडू बुऱ्हाण तडवी (४५, रा. बहुलखेडा) यांचा असल्याचे समोर आले आहे. बहुलखेडा शिवारातील गट क्रमांक १४६ मधील…

Read More

पैठणचे उद्यान 49 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वेगात:3 निविदा दाखल, निविदांची छाननी करून पात्रतेनुसार कार्यवाही होणार‎

येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकास करण्याच्या प्रक्रियेला आता मोठा वेग आला आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे उद्यान पुढील ४९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी आताप . संत ज्ञानेश्वर उद्यान, अ‍ॅडव्हेंचर पार्क आणि डाऊनस्ट्रीम परिसराच्या एकूण २३२ हेक्टर क्षेत्रात कायापालट करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी…

Read More

संभाजीनगरात एशियन हॉस्पिटमध्ये ‘एनआयसीयू’ विभागात पहाटे आग:9 लहान मुलांना विविध रुग्णालयात हलविले

शुक्रवारी पहाटे 2.45 वाजता आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या एनआयसीयू विभागात एसीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात 9 बालक उपचार घेत होते. त्यातील पाच बालकांना घाटीत, तिघांना एमजीएम तर एकास संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 10 ते 15 मिनिटांत आग आटोक्यात…

Read More