संभाजीनगरातील 4 हजार मंदिरांच्या दानपेट्यांतील हिशेब द्यावा लागेल:‘धर्मादाय’चे आदेश, मुस्लिम धार्मिक स्थळे वगळली
शहर आणि जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा अधिक मंदिरांमधील दानपेट्यांचा संपूर्ण ताळेबंद आता धर्मादाय कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी दानपेटी आहे आणि सर्वसामान्य भाविकांना प्रवेश आहे, त्या प्रत्येक मंदिराला आता कायद्याच्या चौकटीत आणत धर्मादाय सहआयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, मंदिराच्या नावावर भाविकांकडून अनधिकृत वाहनतळ (पार्किंग) शुल्क उकळणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांनाही आता या रकमेचा पैन्पैचा…