Headlines

अनियमितता, अखर्चित निधीवरून तूर्त केवळ ‘साक्षी’वर निपटवले:सचिवांची हाेणार झाडाझडती; लेखी खुलासा मागवणार‎

विधिमंडळाच्या पंचायती राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्याचे शुक्रवारी सूप वाजले. तीन दिवसांच्या दौऱ्यात अनियमितता, अपहार, कार्यवाहीत विलंब, अखर्चित निधीवरून संबंधित अधिकाऱ्यांवर समिती सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली असली तरी तूर्तास मोठ्या कारवाईऐवजी सचिवांची साक्ष लावण्याचा अर्थात संबंधितांकडून खुलासा, उत्तरं घेण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती सादर करावी लागणार आहे. यापूर्वी झालेल्या दौऱ्यात अनेकांवर थेट कारवाईचा बडगा…

Read More

बालकांचे पोषण करण्याची समाजातील सर्वांची जबाबदारी- डॉ. वैशाली धनविजय:‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ संकल्पनेतून सामुदायिक सहभागावर भर‎

‘सुदृढ बालक हे केवळ एका कुटुंबाचे यश नसून, समृद्ध आणि सशक्त समाजाचा पाया आहे. त्यामुळे बालकांचे पोषण, माता-बालकांचे आरोग्य आणि अंगणवाडीच्या कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा चिखलकर यांची उपस्थिती…

Read More

शिक्षक दाम्पत्यांच्या प्रयत्नाने बोरी शाळेत पुन्हा किलबिलाट:पटसंख्या गेली 23 वर, ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून भौतिक सुविधा‎

वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळ . धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरी गाव असून कमी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात…

Read More

बागेत शास्त्रज्ञ, बांधावर चर्चा:मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विज्ञानाची साथ, गोपाळपूरमध्ये शेतकरी,‎शास्त्रज्ञ मंचाची बैठक‎

मोसंबी उत्पादनातील अडचणींवर थेट शेताच्या बांधावर शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्पांतर्गत मोसंबी उत्पादक शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नेवासे तालुक्यातील गोपाळपूर येथे झाली. यावेळी प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. रणजीत कडू, रोगशास्त्रज्ञ प्रा. मधुकर शेटे आणि मंचाचे अध्यक्ष साहेबराव ताठे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या…

Read More

विद्यार्थ्यांच्या जनजागृतीमुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट:डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम, नगरला मिळाला द्वितीय क्रमांक‎

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याची शक्यता असताना महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर’ साप्ताहिक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी तसेच डेंगू आजाराबाबत जन . माजी उपमहापौर गीतांजली काळे म्हणाल्या, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून घराच्या परिसरात पाणी साठू न…

Read More

कोळपिंप्री येथील वीर जवान रोहित पाटील अनंतात विलीन:बोरी नदीपात्रात झाले अंत्यसंस्कार,‘अमर रहे’च्या जयघोषाने परिसर हेलावला‎

हरियाणा राज्यातील हथनीकुंड डॅम येथे पूर बचाव मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आलेले पॅरा कमांडो, लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) (वय ३०) यांच्या पार्थिवावर कोळपिंप्री येथे शुक्रवारी रात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार . रोहित पाटील यांना मंगळवारी हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील नियमित बचाव प्रशिक्षण सुरू असताना दुर्घटना घडून त्यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read More

डीजे विरोधी विद्यानंद बापट सोशल मीडियावर हिट;:त्यांच्या अस्खलित शब्दांची तरुणाईला भुरळ

पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजेच्या कर्णभेदी ध्वनिविस्फोटाला विरोध केल्यामुळे हल्ला झालेले विद्यानंद बापट सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या विविध मुलाखतींचे जुने आणि नवे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बापट यांच्या अस्खलित मराठी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाने तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यांनी विविध मुलाखती व माध्यमांतील वापरलेल्या शब्दांविषयी थोडक्यात… अन्य शब्दप्रयोग न दैन्यं…

Read More

हिवरखेडा-गौताळ्याच्या राम मंदिराच्या स्वयंपाकघरात आढळला 7 फूट अजगर:सर्पमित्र अनिल शिरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी दिले जीवदान‎

शहरानजीकच्या हिवरखेडा-गौताळा परिसरातील श्री क्षेत्र श्री नित्यानंद धाम संस्थान राम मंदिराच्या स्वयंपाकघरात ७ फूट लांबीचा भारतीय अजगर आढळून आला. माहिती मिळताच सर्पमित्र अनिल शिरसे यांनी घटनास्थळी धाव घेत या अजगराला पकडले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या उपस्थितीत अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र अनिल शिरसे म्हणाले, भारतीय अजगराला इंडियन रॉक पायथॉन किंवा दगडी अजगर असे…

Read More

शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज- कृषी सचिव परिमल सिंह, फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन‎

शेतीमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘गटशेती’चा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी केले. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपले शिवार, आपली माणसं या विशेष उपक्रमांतर्गत फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे आयोजित शेतकरी…

Read More

Sambhajinagar Temple Donation Box Audit; Charity Commissioner Order

शहर आणि जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा अधिक मंदिरांमधील दानपेट्यांचा संपूर्ण ताळेबंद आता धर्मादाय कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी दानपेटी आहे आणि सर्वसामान्य भाविकांना प्रवेश आहे, त्या प्रत्येक मंदिराला आता कायद्याच्या चौकटीत आणत धर्मादा . मुस्लिम धार्मिक स्थळांचा कारभार ‘वक्फ बोर्डा’च्या अखत्यारीत येत असल्याने मुस्लिम धार्मिक स्थळे वगळता दानपेटी असणाऱ्या उर्वरित सर्व धार्मिक स्थळांवर ही…

Read More