Headlines

बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राजभरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी…

Read More

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे…

Read More

व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली 'रिअल लाईफ', काय आहे मेंदूचा ताबा घेणाऱ्या या 'कल्चर'ची मेख!

हातातील स्मार्टफोन, समोर असलेला कॅमेरा आणि बॅकग्राउंडला वाजणारं एखादं ट्रेंडी म्युझिक… सध्याच्या तरुणाईसाठी हेच सर्वस्व बनलं आहे. पण या 15 ते 20 सेकंदांच्या ‘रील्स’च्या नादात आपण आपलं खरं आयुष्य (रिअल लाईफ) हरवून बसलो आहोत का? एखादं रील व्हायरल व्हावं म्हणून जिवाचा सौदा करणाऱ्या तरुणाईला नेमकं कसलं व्यसन लागलं आहे? या ‘रील कल्चर’ची मेख आणि त्यामागचं…

Read More

जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमधून जाणारा हा…

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

साडीला इस्त्री करण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीचा विनयभंग:गोंदियातील सेवानिवृत्त प्राचार्याचे संतापजनक कृत्य; आरोपी फरार

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका सेवानिवृत्त प्राचार्याने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीच्या साडीला इस्त्री करून देण्याची बहाण्याने आरोपीने मुलीला घरी बोलावले व गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. “माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस…

Read More

महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीने?:राज ठाकरेंची टीका, हुतात्मा स्मारकावरून घेरलं; भावनिक आवाहन करत सरकारच्या भूमिकेवर सवाल

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्मारकाजवळील वातावरण आणि तयारी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर सडेतोड पोस्ट लिहिली असून, सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हुतात्मा चौक येथे जाऊन राज ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन…

Read More

कात्रज बोगद्याजवळ कंटेनर-मोटार अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली घटना, दोघे जखमी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनर आणि मोटारीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मोटारीतील अन्य दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेगाव पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. रघुनाथ मारुती घारे (वय 55, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात…

Read More

सुषमा अंधारेंनी ट्रोलर्सनाच केले ट्रोल:राणे कुटुंब, भुजबळ, अशोक चव्हाण, चित्रा वाघ, भुजबळ, मुश्रीफ, तटकरे कुणालाही सोडले नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेची संधी हुकल्यामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाच ट्रोल केले आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर व्यंगचित्राद्वारे केलेल्या टीकेचा दाखला देत ट्रोल करताना त्याला सुद्धा एक दर्जा लागत असल्याचा दावा केला आहे. भरत थेऊरकर पाटील नामक फेसबुक अकाउंटवरून सुषमा अंधारे यांचे एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात…

Read More

मुंबईत ड्रग्जचा महाभंडाफोड:349 किलो कोकेन जप्त; 1745 कोटींचा माल, अमित शहांचा ‘बॉटम टू टॉप’ उल्लेख, आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1745 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष कौतुक करत ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे हे उत्कृष्ट…

Read More