Headlines

मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन् शेजारी डल्ला मारला:अल्पवयीन चोराचा 70 लाखांचा कारनामा, 6 दिवसांत गुन्हे शाखेने उघड केली चोरीची घटना‎

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद कॉलनी येथे बंद घर फोडून तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याचा गुन्हे शाखेने अवघ्या सहा दिवसांत छडा लावला. त्याच्या मावशीकडे पाहुणा म्हणून आला होता. त्याचदरम्यान तक्रारदाराचे बंद घर त्याच्या नजरेस पडले. घर बंद असल्याची संधी साधून त्याने घरात प्रवेश केला आणि सोन्या-रोकडवर…

Read More

व्यसनमुक्ती, आरोग्य व राष्ट्रीय ऐक्याचा जागर:मनमाडमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करत गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव‎

मनमाड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका, पोलिस दल, कृषी उत्पन्न बाजार समिती, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, डॉक्टर, रिक्षा युनियन तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहण, वृक्षारोपण, जनजागृती रॅली, माजी सैनिकांचा सन्मान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्य इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील…

Read More

अवकाळी नुकसानभरपाईसाठी शेतकरी संघटनेचा सटाणा तहसीलमध्ये ठिय्या:प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन‎

मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीची नुकसान भरपाई, पीक विमा, भेसळयुक्त खतांची विक्री आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या मागणीसाठी बागलाण तालुका शेतकरी संघटना आक्रमक झाली. तहसीलदारांच्या दालनात एक तास ठिय्या देत प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव…

Read More

आ. बंब यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी:कर्जमाफीपासून घरकुलांपर्यंतच्या आकडेवारीवर अधिकारी झाले निरुत्तर‎

खुलताबाद तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आयोजित तक्रार निवारण बैठकीत प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघाले. आपल्या विभागातील योजना, लाभार्थी आणि प्रलंबित कामांची प्राथमिक माहितीही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांन ा देता आली नाही. त्यामुळे “आपल्या खात्याच्या कामाचा अभ्यास तरी करा,” अशा शब्दांत आमदार प्रशांत बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. खुलताबाद तहसील कार्यालयात सोमवारी आमदार प्रशांत बंब यांच्या…

Read More

नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे 2 सौम्य हादरे:पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टरचा धक्का बसला

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारी पुन्हा भूकंपाचे दोन धक्के जाणवले. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात धक्क्यांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ६ मिनिटे ४३ सेकंदांनी २.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र अक्षांश…

Read More

सरपंच मंगेश साबळेला 2 वर्षांसाठी तडीपारीची नोटीस:शासकीय कामात अडथळा, खंडणीसारखे गुन्हे

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश संजय साबळे (२७) यांच्यावरील गुंडगिरी, शासकीय कामात अडथळा, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांनी त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ ऑगस्ट रोजी बजावलेल्या या नोटिशीची मुदत संपूनही साबळे यांनी बाजू न मांडल्याने त्यांच्यावर एकतर्फी कारवाईची शक्यता आहे. साबळे यांच्यावर…

Read More

शासकीय विभागांचा सहभाग:लाडका बाप्पा जाणार सातासमुद्रापार… गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ बहुमान, 480 सार्वजनिक मंडळांना 1.50 कोटींची पारितोषिके

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत गणेशोत्सवाला युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा’ यादीत स्थान मिळवून देण्यासाठी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागांना गणेशोत्सवात सक्रिय सहभाग…

Read More

मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा- एकनाथ शिंदे:म्हणाले- अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घातला

मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ सांगता समारंभात…

Read More

अमरावतीत महारक्तदान शिबिरात 1298 रक्त पिशव्यांचे संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मद्यविक्रेत्यांचा अनोखा उपक्रम

अमरावती येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे पार पडला, ज्यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी…

Read More

विकसित भारतासाठी 'राष्ट्र प्रथम' भावना जपावी:सेवानिवृत्त वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांचे आवाहन

सेवानिवृत्त वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्र प्रथम’ ही भावना जपण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र २०४७ च्या दिशेने वाटचाल करत असताना, विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड कॅम्पस येथे ८० वा…

Read More