Headlines

कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या रुक्मिणी मातेची मानाच्या पालखीचे आज प्रस्थान:400 वर्षांहून जुनी परंपरा, 24 जुलै रोजी होणार पंढरपुरात दाखल‎



विदर्भाची पंढरी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर यात्रेकरिता शुक्रवार १९ रोजी पायदळ मानाची पालखी दुपारी ४ वा. प्रस्थान करेल. ही ४०० वर्षांहून ज

.

१५९४ पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ दिंडी व विदर्भाची एकमेव मानाची पालखी असल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले आहे. निज जेष्ठ शुक्ल पंचमी शुक्रवारी दु. ४ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. तरी पंचक्रोशीतील वारकरी, भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानाद्वारे करण्यात आले आहे. ही पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर रिंगण, दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेल.

कुऱ्हा, अमरावती येथे आगमन रुक्मिणी मातेच्या पालखीचे प्रथम कुऱ्हा व नंतर अमरावती येथे आगमन होणार आहे. त्यानंतर पालखी पुढे निघेल. अमरावती येथे रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत केले जाणार आहे. या प्रसंगी पालखी, टाळ, मृदंगाचा गजर, फुलांचे उधळण, ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी, पालखीला खांदा देण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. या सोहळ्यात सहभागी भाविकांना मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वितरणही केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *