Headlines

अखेर पालकमंत्रिपदे जाहीर:रायगडची धुरा भरत गोगावलेंकडे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी; महायुतीतील 'पॉवर गेम'चा तिढा सुटला

राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेचा बनलेला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक महिन्यांच्या राजकीय रस्सीखेचीनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची, तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची अधिकृत वर्णी लागली आहे. महायुतीतील पॉवर गेमच्या पार्श्वभूमीवर घेतलेला…

Read More

पुण्यात सदनिकेचे कुलूप तोडून 8 लाखांची चोरी:आंबेगाव बुद्रुकसह 3 ठिकाणी घरफोडी, एकूण 9 लाखांहून अधिक ऐवज लंपास

पुणे शहरात घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आंबेगाव बुद्रुक येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. याशिवाय, सिंहगड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ३८ हजार रुपयांचे दागिने, तर येरवड्यातील एका किराणा दुकानातून ३५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल…

Read More

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू:केसनंद फाटा परिसरात अपघात, चालक फरार

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) असे आहे. अरफातचे मामा आसीफ नासीर अन्सारी (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात या…

Read More

श्रावणी सोमवारचा उत्साह:त्र्यंबकेश्वर ते घृष्णेश्वर… महादेवाच्या मंदिरांत भाविकांची मांदियाळी; रात्रीपासूनच रांगा, आकर्षक फुलांच्या सजावटीचे पाहा खास व्हिडीओ

पवित्र श्रावण महिना आणि त्यातच श्रावणी सोमवारचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवमंदिरे ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून गेली आहेत. राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासूनच सुरू असलेल्या महापूजेमुळे आणि गाभाऱ्यात केलेल्या मनमोहक सजावटीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये…

Read More

निवडणूक झाली, नगरसेवक झाले; आता 6 महिन्यांनी पात्रतेची परीक्षा:3 अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर आता सुनावणी

महापालिका निवडणूक झाली, उमेदवार निवडून आले, नगरसेवक झाले; मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २७ नगरसेवकांविरोधात ३७ नोटिसा बजावण्यात आल्या असून तीन अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणांवर टप्प्याटप्प्याने सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची पात्रता तपासली गेल्यानंतर निवडून…

Read More

पहिला श्रावणी सोमवार:सव्वा लाख भाविक घृष्णेश्वराचे घेणार दर्शन; नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्ता अवजड वाहनांसाठी बंद

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या ऐतिहासिक घृष्णेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे सव्वा लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने भाविकांच्या सुखकर दर्शनासाठी, गर्दीच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणेच भाविकांचे दर्शन एक ते दीड तासात होईल. भाविकांच्या सुरक्षेसाठी २२ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि मेडिएटर कंपनीचे ४०…

Read More

महासंयोग:27 वर्षांनंतर पहिला श्रावणी सोमवार अन् नागपंचमी एकाच दिवशी‎; 16 ऑगस्ट 1999 नंतर पहिल्यांदाच जुळून आला दुर्मिळ मुहूर्त

यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत दुर्मिळ‎आणि शुभ पर्वाने होत असून, पहिल्याच श्रावणी‎सोमवारी नागपंचमीचा महासंयोग तब्बल २७‎वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट‎१९९९ रोजी असा योग आला होता. धर्मशास्त्रानुसार‎एकाच दिवशी शिवपूजन आणि नागपूजन करणे‎भाविकांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेष‎म्हणजे, याच दिवशी सकाळी ७ वाजून ५८‎मिनिटांनी सूर्य स्वतःच्या म्हणजेच //”सिंह’ राशीत‎प्रवेश करत आहे. या अनुकूल ग्रहमानामुळे‎शासनस्तरावर विद्यार्थ्यांच्या…

Read More

दोन दिवसांत 12 हजार पर्यटकांची अजिंठ्यास भेट:वाहनतळाची जागा अपूर्ण पडल्याने वाहने रस्त्यावर‎

स्वातंत्र्य दिनासह सलग दोन दिवस सुट्या असल्याने पर्यटकांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला मोठी गर्दी केली होती. या दोन दिवसांत १२ हजार ५०० पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांची संख्या वाढल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडल्याने वाहने जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उभी करावी लागली. सलग सुट्यांमुळे अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाळा…

Read More

भंडारदरा ‘फुल्ल’; रंधा, कळसुबाई अन् हरिश्चंद्रगड पर्यटकांनी गजबजले:जोडून आलेल्या सुट्यांमुळेसुमारे 15 ते 20 हजार पर्यटकांची हजेरी

शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुट्टी, त्यात पावसाळी वातावरण आणि निसर्गाचे खुललेले रूप यामुळे पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात रविवारी पर्यटकांची झुंबड उडाली. भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी) यांसह विविध पर्यटनस्थळांवर सुमारे १५ ते २० हजार पर्यटकांनी हजेरी लावली. रंधा परिसरात पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत होती. पुणे,…

Read More

श्रावणोत्सव:कुडलसंगमच्या धर्तीवर मांजरा नदीपात्रात उभारले जागृत "श्रीरामलिंगेश्वर'

तालुक्यातील जवळगा येथील मांजरा नदीपात्रात वसलेले श्रीरामलिंगेश्वर देवस्थान हे पंचक्रोशीतील एक जागृत आणि ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले एकमेव देवस्थान आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने या कुडलसंगमच्या धर्तीवर उभारलेल्या अनोख्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. जवळगा गाव पूर्वी दंडकारण्याचा भाग होते. दक्षिणेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी नदीपात्रात रामलिंगेश्वराच्या पिंडीची स्थापना केल्याची आख्यायिका…

Read More