Headlines

साखरपुडा केला, 2.60 लाख उकळले:नवरी मात्र अल्पवयीन‌!

विवाहाचे स्थळ दाखवून घरगुती साखरपुडा केला, लग्नाची तारीखही निश्चित केली आणि त्यानंतर मुलीच्या आजीच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून तब्बल २ लाख ६० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात समोर आली आहे. विशेष म्हणजे, पोलिस तपासात नवरी मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन असल्याचे तसेच तिच्यासोबत आलेले आई, मावशी व भाऊ म्हणून सांगितलेले व्यक्ती तिचे नातेवाईक नसल्याचे…

Read More

विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासणे आवश्यक:चांदवड येथे डॉ. चंद्रशेखर उपासनी यांचे आवाहन‎

‘भारतीय रसायनशास्त्राचे जनक’ आणि महान रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांनी ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिल्या औषध कंपनीची स्थापना करून भारतीय औषध उद्योगाचा पाया रचला व स्वदेशी उद्योगाला दिशा दिली. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या भावनेतून वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन श्रीमान…

Read More

हत्या:मालेगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघे ताब्यात

शहरातील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. १५) सायंकाळी ६० फुटी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी (दि. १७) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत तरुणाचे नाव मोहम्मद जुबेर…

Read More

श्रावणाच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद दुमदुमले:4 लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन

श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच सुरू झालेल्या दर्शनाच्या ओघाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने आणि ‘जय भद्रा, भद्रा हनुमान की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारुती रायाची केलेली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. शुक्रवारी रात्री १२…

Read More

गौरव:शिल्लेगावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा गौरव

केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरण, गुणवंतांचा गौरव आणि शाळा विकासाच्या संकल्पाने हा सोहळा विशेष ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कावेरी राऊत आणि वैजनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी नारायणराव जाधव यांच्या ७२ व्या…

Read More

तिरंगा रॅली:औराळा येथे 501 फूट भव्य तिरंगा रॅली ठरली आकर्षण

कन्नड तालुक्यातील आर. जि. एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विकास जिवरख आणि संचालिका गीता जिवरख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. संपूर्ण औराळा गावात ५०१ फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य तिरंगा…

Read More

प्रगतिशील शेतकरी:केवळ 10 गुंठ्यामध्ये सेंद्रिय शेतीतून साडेतीन ते चार महिन्यात एक लाख रुपयांचे उत्पन्न, वंदना धोत्रे यांचा सेंद्रिय शेतीचा अभिनव प्रयोग

पारंपरिक पिकांना छेद देत नवनवीन प्रयोग करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील विवरा (ता. पातूर) येथील प्रगतशील शेतकरी देविदास धोत्रे आणि त्यांच्या पत्नी वंदना धोत्रे यांनी सेंद्रिय शेतीत अभिनव यश मिळवले आहे. धोत्रे दांपत्याने द्राक्षाच्या घडासारख्या दिसणाऱ्या “चेरी टोमॅटो’चा यशस्वी प्रयोग केला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ते 10 गुंठे क्षेत्रात पीक घेऊन चांगला नफा मिळवत आहेत. धोत्रे…

Read More

अमरावतीत मोकाट गुरांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त:मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका वाढला

अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्ते, गजबजलेले चौक आणि अंतर्गत मार्गांवर गुरे थांबत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अमरावती-बडनेरा…

Read More

सावकारी लुटीविरोधात स्वातंत्र्यदिनी आंदोलन:प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अचलपुरात आज बैठक

अमरावती, अचलपूर येथील मानव हक्क संघटनेने सावकारी कर्जाच्या आडून आदिवासींची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले. अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय उत्सव सुरू असतानाच, त्याच परिसरात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या लक्षवेधी आंदोलनाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्यम गांधी यांनी घेतली. सीईओंच्या मध्यस्थीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तोडगा काढण्यात आला. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांसोबत…

Read More

अभियंत्यांनी रोजगारनिर्माते बनावे:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन, म्हणाले- सीओईपी दीक्षांत समारंभात उद्योगांची स्थापना करावी

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अभियंत्यांना केवळ रोजगार शोधण्याऐवजी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन करण्याचे आवाहन केले. भारताच्या आर्थिक वाढीमध्ये आणि राष्ट्रीय विकासामध्ये सीओईपी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे…

Read More