Headlines

Rohit Pawar MLC Election Allegation; Mavia Will Still Shock!


राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पैशांच्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जात असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीवर अप्रत्

.

‘प्रत्येक मतदाराला 25 लाख रुपये दिल्याची चर्चा’

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने पैशांचा वापर केला जात आहे, ती चिंतेची बाब आहे. प्रत्येक मतदाराला सुमारे 25 लाख रुपये दिले जात असल्याची चर्चा आहे.” या दाव्याबाबत त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केले नसले, तरी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘100 मतदार असतील तर 25 कोटींचा व्यवहार’

रोहित पवार यांनी या कथित व्यवहाराचा अंदाजही मांडला. “जर एखाद्या मतदारसंघात 100 मतदार असतील, तर हा आकडा 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतो.” त्यांच्या मते, निवडणूक प्रक्रियेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा फिरत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.

‘महायुती काही ठिकाणी आघाडीवर दिसते’

विधान परिषद निवडणुकीतील सध्याच्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना पवार म्हणाले, “पैशांचा वापर आणि मतदारसंख्येचे गणित पाहता काही ठिकाणी महायुती निश्चितपणे आघाडीवर असल्याचे दिसते.” महायुतीकडे संख्याबळ आणि संसाधनांची ताकद असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला.

‘मात्र महाविकास आघाडी धक्का देऊ शकते’

तथापि, सर्वच जागांवर महायुतीचे वर्चस्व राहील असे नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. “काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला आश्चर्यकारक विजय मिळू शकतो.” त्यांच्या मते, स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती आणि मतदारांचे समीकरण काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊ शकते.

विधान परिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडले. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा कसही लागेल. महायुतीचे हे 6 उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. सत्ताधारी महायुतीने ‘मास्टरस्ट्रोक’ लगावत 6 जागा बिनविरोध जिंकून ‘बूस्टर डोस’ मिळवला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढाई रंगणार असून, 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नेमका कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला गुलाल लागणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले

दरम्यान, रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील पैशांच्या कथित वापराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात असला, तरी महायुतीकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, मतदान आणि मतमोजणी जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र होताना दिसत आहे. महायुतीचे संख्याबळ आणि महाविकास आघाडीची संभाव्य ‘सरप्राईज’ कामगिरी यामुळे या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बिनविरोध विजयी उमेदवार..

  1. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
  2. पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
  3. ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
  4. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
  5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
  6. अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे, भाजप

आमने-सामने कोण ?

  1. सोलापूर राजेंद्र राऊत (भाजप) वि. वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शप)
  2. जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) वि. शरद तायडे (शिवसेना उबाठा)
  3. सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप) वि. अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी शप) वि. किशोर धुमाळ (अपक्ष)
  4. नांदेड – अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध कृष्णा पाटील (शिवसेना उबाठा)
  5. नागपूर (पोटनिवडणूक) डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे)
  6. भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप) विरुद्ध नरेश ईश्वरकर
  7. नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)
  8. अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षदीप देशमुख (काँग्रेस)
  9. धाराशीव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
  10. परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर
  11. छत्रपती संभाजीनगर – जालना सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

संबंधित बातमी वाचा…

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान:6 जागा बिनविरोध, 22 जूनला निकाल; पैशांचा गैरवापर करून निवडणुका बिनविरोध केल्या, मविआचा आरोप

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढाई रंगणार असून, 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नेमका कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला गुलाल लागणार, याचे चित्र स्पष्ट होईल. संपूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.