राम मंदिर चोरी- अयोध्येत UP काँग्रेस अध्यक्ष नजरकैदेत:पत्नी म्हणाली- अधर्मी भाजप सरकारकडून जीवाला धोका; ट्रस्टला घेरणार होते
अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता अयोध्या येथील एका हॉटेलमध्ये नजरकैद केले. अजय राय यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे, ते रात्रीच अयोध्याला पोहोचले…