![]()
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत असून, आता तिचे वडील सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणी भाजप नेते व मंत्री नितेश राणे हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. आता यावर त्यांचे बंधू आमदार नीलेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नीलेश राणे म्हणाले, सीबीआयने मालवणी पोलिस स्टेशनमधून सीडीआर, टॉवर लोकेशन रिपोर्ट मागितले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट मागितले आहेत. आता सीबीआयने एफआयार लॉन्च केला आहे. आता ते त्यांचा तपास करतील. कोण आरोपी असावेत कोण नसावेत. एफआयआरमध्ये कोणाचे नाव आलेले नाही हेही नंतरच कळणार आहे. पण आता यामध्ये जे कोणी असतील, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे, पण ते कोण असावेत हे मी आता सांगू शकत नाही. तपासानंतरच ते समोर येईल. पुढे बोलताना नीलेश राणे म्हणाले, नीलेश ओझा यांनी कोर्टाला काही पुरावे दिले आहेत. प्रकरणातले काही तथ्य जुळून येत नाहीत. यामध्ये आता युक्तीवाद होईल. त्यानंतर सगळे समोर येईल. सालियानचे वकील नीलेश ओझा यांनी जमवलेले पुरावे या प्रकरणामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. न्यायालयाने सीबीआयला आदेश दिले आहेत की ही केस पुन्हा ओपन व्हावी. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे आता पुढे या प्रकरणात कारवाई होईल, असे राणे यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानीची नोटीस दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी वकील निलेश ओझा यांच्यासोबत जाऊन आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस दिली. कलानगरच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली. या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांनी सात दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर 500 कोटींचा दावा दाखल करण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. वरुण सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंवरील सर्व आरोप फेटाळले या नोटीस प्रक्रियेदरम्यान ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; यावेळी आपल्या वकिलांना धमकी दिल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला. या सर्व घडामोडींवर आमदार वरुण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरेंची बाजू सावरून धरली आहे. आदित्य यांच्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन असून, आपण गेली अनेक वर्षे हेच सांगत असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
Source link
'गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणलेच पाहिजे':दिशा सालियान प्रकरणी नीलेश राणेंची स्पष्ट भूमिका, काय म्हणाले राणे?