Headlines

Film style fight between doctors and nurses at Ladsawangi Health Center



लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या उपचारावरून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध करमाड ठाण्यात तक्रार

.

शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळकुंठा येथील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम मुंडे आणि परिचारिका सुकेशिनी साळवे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही महिला कर्मचाऱ्यांमध्ये थेट प्रसूती कक्षाबाहेर हाणामारी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघींना एकमेकांपासून वेगळे केले. दरम्यान, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याने अखेरीस नातेवाईकांनी संबंधित रुग्णाला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सीईओंकडे अहवाल सादर करणार Ãघटनेचा व्हिडिओ प्राप्त झाला आहे. रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मतभेद मिटवून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र, पुन्हा वाद झाला. माहिती घेऊन सीईओंकडे अहवाल सादर करणार आहे. – डॉ. नागेश सावरगावे, तालुका वैद्यकीय अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *