- Marathi News
- National
- Fire Breaks Out At The Refinery Where The Prime Minister Was To Inaugurate Today, A Large Part Of The Unit Worth Rs 3,000 Crores Burnt To Ashes
बाडमेर5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

देशातील सर्वात हायटेक पचपदरा रिफायनरीचे मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे पोहोचून उद्घाटन करणार होते. मात्र २० तास आधी सोमवारी दुपारी १:५२ वाजता सीडीयू युनिटमध्ये भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धूर सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उठताना दिसला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
हे तेच युनिट होते, जिथून पंतप्रधान मोदी चाक फिरवून रिफायनरीतून तेल उत्पादन सुरू करणार होते. तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रिफायनरीचे उद्घाटन निश्चित झाले होते, पण भीषण आगीमुळे ३००० कोटींच्या सीडीयू युनिटच्या मोठ्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर पंतप्रधानांचा पचपदरा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
परिणाम? रिफाइंड तेल युरोपला पाठवण्यास विलंब होईल
भारत ८८% कच्चे तेल परदेशातून खरेदी करतो. या रिफायनरीचे वैशिष्ट्य हे आहे की ती परदेशी तेलासह (७५ लाख मेट्रिक टन प्रतिवर्ष) बाडमेरच्या स्थानिक ‘मंगला टर्मिनल’मधून निघणाऱ्या देशांतर्गत कच्च्या तेलालाही (१५ लाख मेट्रिक टन प्रतिवर्ष) रिफाइन करेल. हे सुरू झाल्यामुळे आपल्याला परदेशातून कमी तेल मागवावे लागेल.
कसे घडले? हीट एक्स्चेंजरमधून ऑइल लीक झाल्याने आग
सीडीयू युनिट हे रिफायनरीचे हृदय असते. येथूनच संपूर्ण क्रूड तेलाचे रिफायनिंग होते. असे सांगितले जात आहे की, हीट एक्स्चेंजरमुळे ऑइल लीक झाले आणि आग लागली. वास्तविक, सीडीयूमध्ये हीट एक्स्चेंजरचे काम थंड कच्च्या तेलाला गरम करणे आणि उष्ण रिफाइंड तेलाला थंड करणे असते. यामध्ये एका बाजूला खूप जास्त तापमान (३०० ते ३५० अंश) व दुसऱ्या बाजूला खूप जास्त दाब असतो. तेल प्रचंड दाबाने एका छोट्या छिद्रातून लीक झाले आणि त्याने पेट घेतला. रिफायनरीमध्ये शट-ऑफ व्हॉल्व्ह असतात, जे गळतीची माहिती मिळताच तेलाचा पुरवठा खंडित करतात. यामुळे आगीवर १.४५ तासांत नियंत्रण मिळवता आले.