Headlines

Hindustani Bhau Slams Manoj Jarange Over Maratha Reservation Controversy


मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल एकेरी भाषेत टीका करत आहेत. तुम्ही त्यांना हलक्यात घेत आहात का? ते असेच इतक्या मोठ्या पदावर गेले नाही. तुमच्या सारखे किती गायब झाले असतील सांगता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना ध

.

विकास पाठक म्हणाले की, खूप वर्षांपूर्वी मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढले, आंदोलने केली. पण कधीही त्या मराठी बांधवांनी कोणाला त्रास दिला नाही. नियम पाळले, रस्त्याने गेले आले पण कधीही किंचितही त्रास कोणाला होऊ दिला नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे की आपण आपल्या हक्कांसाठी लढलो पाहिजे. त्यांची आज गरज आहे, सुद्धा बोललो पाहिजे. संविधानाच्यावर जात आपण मनमानी कराल हे चालणार नाही.

मुंबईत यायला हीच वेळ भेटली का?

विकास पाठक म्हणाले की, नवीन योद्धा मराठा योद्धा यांनी सांगितले आहे की मी 19 तारखेला मुंबईत येत आहे. गेल्या वेळेससुद्धा तुम्ही मुंबईमध्ये आले होते. सणाचे दिवस आहे, गेल्या वेळेस तुम्ही आले त्यावेळी तुम्ही रस्ते, हॉटेल आणि मॉलमध्ये धिंगाना केला इतके घाणं केले त्या सणाची तुम्ही वाट लावली. महाराष्ट्रभरात गणेशोत्सव साजरा होत आहे याच वेळी तुम्ही मुंबईत येणार तुम्हाला हीच वेळ भेटली का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला आहे.

लोकांचे सण खराब करणार

विकास पाठक म्हणाले की, तुम्ही यावर्षीपण येणार आणि लोकांचे सण खराब करणार. मागच्यावेळी तुम्ही आले लोकं काही बोलले नाही. मागच्यावेळेस तुम्ही लोकांना सांगितले भावानो आपण जिंकलो. त्यावेळी तुमच्यासोबत असलेले काही लोकं समजून सांगत होते तर तुम्ही त्याला दम दिला आणि शांत केले. त्यावेळी मराठी बांधवांनी तुमचे ऐकले. तुम्हाला माहिती नाही तर शिकलेल्या लोकांचे ऐकूण घ्या. मराठा समाज बांधवांसोबत का खेळत आहात. हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे आई-वडील रडत आहे. मराठा समाजाची पिढी बरबाद करण्याचे काम सुरू आहे.

..तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील

विकास पाठक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर बसून तिथे थुंकताय ही तुमची लायकी आहे. मराठ्यांनो हा माणूस तुम्हाला फसवत आहे हे कधी ना कधी येणार आहे. तुम्ही जाळ्यात फसू नका. हा माणूस उद्योजकांचा फायदा करत आहे. संविधानात जे लिहले आहे तेच सरकारला मान्य करावा लागेल. देशात संविधान आहे हे लक्षात ठेवा तुमच्या मनाने काही होत नाही. आझाद मैदानावर येण्याची काय गरज नाही परवानगी नाकरली असताना. त्यामुळे मुलांवर गुन्हे दाखल होतील. हा माणूस चांगला नाही, त्यांच्यासोबत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील.

हे ही वृत्त वाचा

जरांगेंच्या उपोषणाचा 19 वा दिवस:मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; बीपी, शुगर लो तरीही उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. पाणी आणि सलाईन बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. आज बीडमधील पाटोद्यातून ते अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात मुक्कामी जाणार आहे. काल रात्री अडीच वाजता त्यांनी मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले आहे. यानंतर आता पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली आहे. अहिल्यानगरात होणारी ‎संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्रीगोंदे ‎शहर व तालुक्यात मोठा पोलिस‎ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎जरांगे पाटील आज रात्री श्रीगोंदे ‎शहरातील बाजार तळ परिसरात ‎दाखल होणार असून तेथे त्यांच्या‎ मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली‎ आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *