Headlines

Mahajans Rebellion Quashed? Jalgaon Election Questions; Khadses Criticism


उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर क

.

‘संकटमोचक’ प्रतिमेवर खडसेंचा सवाल

जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना भाजपमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधकांमधील बंडखोरी शांत केल्याचे दावे केले जातात. मात्र, यावेळी स्वतःच्या महायुतीमधील बंडखोरीच रोखण्यात त्यांना अपयश आले आहे.

खडसे म्हणाले, “दुसऱ्यांच्या पक्षातील बंडखोरी मोडण्यात ज्यांना यश येते, त्यांनाच स्वतःच्या आघाडीत निर्माण झालेली नाराजी थांबवता आलेली नाही. हे महायुतीसाठी चिंतेचे चित्र आहे.”

जळगावमध्ये अजूनही बंडखोरी कायम

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेद अधोरेखित करत भाजप नेतृत्वावर निशाणा साधला.

‘17 पैकी 17 जागा’ दावा कितपत वास्तववादी?

नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर गिरीश महाजन यांनी महायुती सर्व 17 जागा जिंकेल, असा दावा केला होता. मात्र, खडसे यांनी या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, निवडणूक होण्यापूर्वीच विजयाचे दावे करणे योग्य नाही. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील नाराजी आणि बंडखोरी महायुतीसाठी अडचणी निर्माण करू शकते.

जळगावची लढत प्रतिष्ठेची का?

जळगाव हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येथे झालेली कोणतीही मतांची फूट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला केवळ निवडणूक प्रतिक्रिया न मानता व्यापक राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढले

नाशिकमध्ये बंडखोरी आटोक्यात आल्याचे चित्र असले तरी जळगावमधील परिस्थिती अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. महायुतीच्या नेत्यांकडून समन्वयाचे प्रयत्न सुरू आहेत, तर विरोधक या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत निकाल काहीही लागला, तरी महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा मुद्दा आगामी काळात उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे. संबंधित बातमी वाचा…

नाशिकमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन मनधरणी’:उदय सामंत म्हणाले- गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकला नाही, विनंती करणे 302चा गुन्हा होत नाही!

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक फेऱ्यांच्या चर्चांद्वारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीते यांनी अद्याप माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या राजकीय गणितात नवा ट्विस्ट आला आहे. सविस्तर बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.