Headlines

Maharashtra CM Fadnavis Orders Foreign Travel Ban



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष

.

विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय परदेश प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.

मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या घटणार

केवळ परदेश दौरेच नाही, तर राज्यातील मंत्र्यांच्या लवाजम्यावरही आता मर्यादा येणार आहे. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची मोठी रांग असते, ज्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता मंत्र्यांच्या ताफ्याचा आढावा घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात गरजेपेक्षा जास्त वाहने आहेत, ती तातडीने कमी केली जाणार आहेत. विशेषतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता कमी दिसणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांकडे कल आणि इंधन बचत

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रशासकीय वर्तुळात इंधन बचतीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक मंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवासाला प्राधान्य देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनामध्ये केवळ इंधनच नाही, तर इतर अनेक गोष्टींमध्ये काटकसर करण्याचे सांगितले होते. यामध्ये सोन्याची खरेदी टाळणे, खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे आणि जास्तीत जास्त ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे अशा मुद्यांचा समावेश आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा अवलंब करून स्वदेशी उत्पादने वापरण्यावरही त्यांनी भर दिला आहे. याच आवाहनाचा आधार घेत राज्य सरकारने आता प्रशासकीय शिस्त आणि काटकसरीचा नवा पायंडा पाडला आहे.

हे ही वाचा…

एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा (EV) वापर सुरू केला असून इतर मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.