राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काही
.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी विभागाकडून सर्वच शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने जे कर्जमाफी केली त्यामध्ये 16 लाख 96 हजार खात्याची यादी आपल्याकडे लागली आहे. जिल्हा बँकेत काही अडचण वाटत नसली तरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी जेव्हा तिथे ई केवायसी करायला जातो त्यावेळी त्याच्यावर असलेले कर्ज आणि व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते.
राज्यामध्ये खताचा पुरेसासाठा उपलब्ध
दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यामध्ये खताचा पुरेसासाठा उपलब्ध आहे, शेतकऱ्यांनी चिंता करू नये. 85 कंपन्यावर आपण FIR दाखल केला असून शेतकऱ्यांचे बियाणे बदलून देण्याचे सांगितले आहे. 45 लाख 10 हजार हेक्टर सोयाबिन लागवड झाली आहे, तक्रारीमध्ये 24 हजार हेक्टर पेरणीच्या तक्रारी आल्या आहेत. या बाबतीमध्ये आमचे सर्व कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यामध्ये 84 टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे.
गुलाबराव पाटलांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ
दत्तात्रय भरणे म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केले त्यांचा चुकाचा अर्थ काढण्यात आला त्यामध्ये गुलाबराव पाटील म्हणाले की आम्ही शेतकरी सहन करतो पण उद्योजक सहन करू शकणार नाही पण त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ते शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांवर प्रेम आहेच. ते शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या करत असतात.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
वीज पुरवठा नसेल तर एक वेळ शेतकरी म्हणून आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा त्रास होऊ देऊ नका, असे वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. वीज खंडित झाल्यास उद्योजकांचे मोठे नुकसान होते. उत्पादन थांबले तरी मजुरी द्यावी लागते. विजेच्या अडचणींमुळे नवीन उद्योजक उद्योग सुरू करण्याबाबत विचार करतात. लहान-मोठ्या उद्योगांमुळे 12 वी पास तरुणांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांना त्रास नको, ही हात जोडून विनंती आहे. मोठे उद्योग व बंधारे व्हावेत पण लहान उद्योग व बंधारेही व्हायला हवेत, असे पाटील म्हणाले.
संबंधित वृत्त वाचा दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:विमा लॉबीने पर्जन्यमापकात बर्फाच्या बाटल्या ठेवून पाडला बनावट पाऊस, राज्यात पहिल्यांदाच 40 हवामान केंद्रांत छेडछाड

पीकविमा योजनेत भरपाई मिळवण्यासाठी हवामान आधारित ट्रिगर आवश्यक असते. हे ट्रिगर कृत्रिमरीत्या सक्रिय करण्याच्या उद्देशाने जालना 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये छेडछाड केली. काही पर्जन्यमापकांमध्ये बर्फाने भरलेल्या बाटल्या ठेवल्या. फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी कार्यरत असलेल्या लॉबीने हा प्रकार केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले. वाचा सविस्तर
कर्ज 2 लाख अन् माफी सव्वालाख:शेतकऱ्यांचे उरलेले कर्ज कोण भरणार? कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये शेतकऱ्यांवर 2 लाख 6 हजारांचे कर्ज आहे ते कर्जमुक्तीच्या यादीत सव्वा लाख रुपयेच दाखवल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. उरलेले कर्ज बँक भरणार का? अनेक शेतकऱ्यांसोबत हेच होत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. तर कर्जमुक्तीचे क्रेडिट घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही आमदार दानवे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा:पहिल्या टप्प्यात 13,600 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी ऑगस्टमध्ये; नाव नसल्यास तक्रारीचे आवाहन

राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 13 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर