Headlines

Manisha Hawaldar Sold NEET Questions, Burned Notes; Shocking Revelations



देशभरात खळबळ माजवणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात कमालीची खोलवर रुजल्याचे आता समोर येत आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची (NTA) अधिकृत अनुवादक मनीषा हवाल

.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या अधिकृत अनुवादक म्हणून कार्यरत होत्या. अधिकृत अनुवादक असल्याने त्यांच्याकडे प्रश्नपत्रिकेची माहिती आधीच उपलब्ध होती. मात्र, आर्थिक मोबदल्यासाठी त्यांनी मनीषा मांढरे नावाच्या दुसऱ्या आरोपीशी संगनमत केले आणि काही ठराविक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवले. मनिषा हवालदार यांना पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करून त्यांची ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली असून, त्यांना २५ तारखेला दिल्ली न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी ‘नोट्स’ जाळल्या

सीबीआयच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या हाती काही लागू नये, या उद्देशाने मनीषा हवालदार यांनी भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हाताने लिहिलेल्या सर्व ‘नोट्स’ जाळून टाकल्या. इतकेच नाही तर, मनीषा मांढरेसोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटिंगही त्यांनी डिलीट केले आहे. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या फोनऐवजी पतीच्या फोनचा वापर करून प्रश्नमालिका पुढे पाठवल्याचेही तपासात उघड झाले आहे.

स्मरणशक्तीच्या जोरावर मांढरेचा सीबीआयला चकवा

दुसरीकडे, या प्रकरणातील दुसरी महत्त्वाची आरोपी मनीषा मांढरे हिला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. मांढरेच्या चौकशीत तांत्रिक अडचणी येत असल्याने सीबीआय अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कारण मनीषा मांढरेची स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असल्याने तिला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. त्यामुळे तिने लेखी स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात कोणताही ठोस पुरावा मागे ठेवलेला नाही. पेपरफुटीतील अन्य एक आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मांढरेचे नाव घेतल्यानंतर हे बिंग फुटले.

पुण्यातील या दोन महिलांच्या अटकेमुळे नीट पेपरफुटीचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, हे आता स्पष्ट होत आहे. सीबीआय आता या प्रकरणातील इतर आर्थिक व्यवहारांचा आणि या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या नावांचा समावेश आहे, याचा तपास करत आहे.

हे ही वाचा…

नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता या प्रकरणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण नॅशनल टेस्टिंग एजन्सीच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.