महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरत ‘आक्रोश मोर्चा’ काढला आहे. हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय अस
.
राजीनाम्याची आक्रमक मागणी
MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील पेपरफुटी, सातत्याने होणारा नियोजनाचा अभाव आणि गट ‘ब’ परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी, अशा एकूण १२ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. आयोगाच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, या सर्व प्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चेकरी करत आहेत.
वाहतुकीत मोठे बदल; हे मार्ग बंद
मोर्चाची व्याप्ती पाहता शहर वाहतूक शाखेने सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या दृष्टिकोनातून वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. मोर्चाच्या मार्गावरील अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि उद्धवराव पाटील चौक हा मुख्य रस्ता आज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरात विद्यार्थ्यांचा तिसऱ्यांदा एल्गार
छत्रपती संभाजीनगर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून काढलेला हा सलग तिसरा मोठा मोर्चा आहे. यापूर्वी जुलै महिन्यात MPSC गट ‘क’ परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. तर त्याआधी नोव्हेंबर महिन्यात वारंवार एकाच वेळी दोन परीक्षांच्या तारखा येत असल्याने नियोजनाच्या अभावावरून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. आता पेपरफुटीसारख्या अत्यंत गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला असून, सरकार आणि आयोगाचे डोळे उघडण्यासाठी ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा..
एमपीएससी वाचवायची असेल तर अध्यक्ष बदला: रोहित पवार: विवेक भीमनवारांचा राजीनामा घेऊन तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा, अन्यथा 16 सप्टेंबरपासून आंदोलन

आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी मागणी केली की, जर एमपीएससी वाचवायची असेल तर आयोगाचा अध्यक्ष बदलला पाहिजे. त्यांनी विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. अन्यथा, १६ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा