![]()
शिक्षक नियुक्ती घोटाळ्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचा तपास करत असताना इतरही काही शिक्षकांच्या नेमणुकांना घेऊन शालेय शिक्षण विभागाला संशय आला होता. अशातच आता एकट्या नागपूर विभागातील 1397 शिक्षकांच्या नियुक्त्या
.
दरम्यान, 2012 नंतर अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने केल्याचे शिक्षण विभागाला शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान तपासात पुढे आले होते. त्यामुळे या 1397 शिक्षकांना व्यक्तिशः सुनावणीसाठी बोलावून त्यांची कागदपत्रे व निवडीची प्रक्रिया तपासली जाणार आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही पडताळणी होणार असून, जे शिक्षक या प्रकरणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.
6 जिल्ह्यांमध्ये नियुक्त्यांचीही चौकशी होणार
शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर आता 2012 पासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या नियुक्त्यांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतांच्या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांच्या नेतृत्वाखालील समित्यांनी नागपुरात दोन दिवस तळ ठोकून सुमारे एक हजार प्रकरणांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.
शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षण विभागातील शिक्षक भरती प्रक्रियेतील अनेक अनियमितता उघडकीस आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपसंचालकांसह काही शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या वैयक्तिक मान्यतांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमाणपत्रांची पडताळणी होणार
या तपासणीमध्ये नियुक्त शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता होती का, नियुक्तीची प्रक्रिया नियमानुसार झाली होती का, उमेदवारांनी सादर केलेली शैक्षणिक व अन्य प्रमाणपत्रे खरी आहेत का, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची सध्याची सेवा स्थिती काय आहे, याची सखोल माहिती घेण्यात आली. तसेच, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली होती का, याचीही कसून पडताळणी करण्यात आली आहे.