Headlines

प्रवेशोत्सव:बैलगाडी अन् ट्रॅक्टरमधून नवागतांची मिरवणूक‎, सव्वा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. १५) तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित अशा एकूण ४५६ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये सजविलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर…

Read More

आई म्हणाली- NEET पुन्हा घ्याल, पण मुलगी परत आणू शकाल?:राहुल म्हणाले- आकांक्षाचा मृत्यू मोदींच्या व्यवस्थेचे पाप, भाजपने म्हटले- प्रचाराचा नेता

NEET पेपर लीक झाल्यानंतर नागपूरमध्ये आत्महत्या केलेल्या मऊगंजच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या घरी शोककळा पसरली आहे. आपल्या मुलीला गमावलेल्या आई नीलम चतुर्वेदींचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवते. त्या रडत म्हणतात, “पेपर तर तुम्ही पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?” त्यांच्या डोळ्यासमोर आजही आकांक्षाचे शेवटचे शब्द फिरत राहतात. नीलम सांगतात की त्यांची मुलगी अनेकदा स्वप्नात…

Read More

काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन‎

आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच तज्ज्ञांनी पनवेल येथील पालकांच्या भरगच्च कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य किशोरवस्थातज्ज्ञ संघटना व रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पनवेल, मुंबई येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात “बदलत्या…

Read More

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कट फसला:टीप मिळताच पोलिसांनी केले नजरकैद; शिंदेंनीही मागवला अहवाल

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या धाराशिवच्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घालण्याचा कट आखला होता. पण पोलिसांना कार्यक्रमापूर्वीच या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी संशयितांची धरपकड केली. आता शिंदेंनी पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. ते स्थानिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही हजर राहणार होते….

Read More

CSMC & BPCL Launch Swachhta Pandharwada at Jadhavwadi Bus Depot

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या संयुक्त विद्यमाने जाधववाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत ही राष्ट्रीय स्वच् . यावेळी बीपीसीएलने शहर बस सेवा अधिक सुलभ व सक्षम करण्यासाठी बस डेपोमध्ये ग्राहक इंधन पंप (कन्झ्युमर पंप) उपलब्ध करून…

Read More

जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’:108 सरासरीच्या तुलनेत 66 मिमी बरसला, 42 मिमी पावसाची तूट कायम‎

. “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सरासरीच्या ४२ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचे २३ दिवस ‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा…

Read More

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबले असून, अमरावती शहरातील संभाव्य पाणीसंकट टळले आहे. आमदार खोडके यांनी कंत्राटदारांना त्यांच्या प्रलंबित रकमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून, येत्या आठवडाभरात कंत्राटदारांना त्यांची देयके…

Read More

अमरावतीत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र सुरू:महिलांना एकाच छताखाली योजनांची माहिती व समस्या निराकरण

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘मिशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र’ उघडण्यात आले आहे. महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, हा या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. हे केंद्र अमरावती येथील जुन्या तहसील कार्यालयात, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला स्थित आहे….

Read More

दिग्दर्शक सनोज म्हणाला- सत्याचा विजय झाला:म्हटले- मोनालिसाचे ब्रेनवॉश करून खोटे आरोप लावले; फरमान खानवर पॉक्सो कायदा लागल्याने आनंद व्यक्त केला

चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी महाकुंभातील व्हायरल गर्ल ‘मोनालिसा’च्या विवाह प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) च्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. आयोगाच्या अहवालानुसार, 11 मार्च 2026 रोजी झालेल्या लग्नावेळी तिचे वय फक्त 16 वर्षे, 2 महिने आणि 12 दिवस होते. या अहवालानंतर मोनालिसाचा पती फरमान खान याच्या विरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बकरी ईदमुळे पाचोडच्या बाजारात बोकडास मिळाला ५० हजारांचा दर:किमतीत दुपटीने वाढ, वजनदार बोकडांना पसंती, खरेदीसाठी गर्दी‎

प्रतिनिधी | पाचोड मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर पाचोड येथील जनावरांच्या बाजारात रविवारी मोठी उलाढाल झाली. कुर्बानीसाठी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा बाजारात बोकडांचे दर गगनाला भिडले असून, आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकडांना ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अवघ्या एका दिवसात या बाजारात लाखो रुपयांचे व्यवहार झाले…

Read More