Headlines

अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय:'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार?




मराठी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्यावसायिक टीआरपीचे कारण पुढे करत स्टार प्रवाह वाहिनीने ही मालिका अवघ्या 152 भागांमध्येच अचानक गुंडाळल्यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत या मालिकेचे निर्माते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही मालिका आता एका नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिमाखात सुरू होणार आहे. 20 जूनपासून ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर प्रीमियर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना ही बातमी दिली आहे. आगामी 20 जून रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता या मालिकेचा भव्य प्रीमियर होणार असून, ही मालिका आता ‘मराठी वारसा’ या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात टीव्हीवरून बंद पडलेली मालिका थेट युट्यूबवर त्याच भव्यतेत सुरू करण्याचा हा पहिलाच क्रांतिकारी प्रयोग मानला जात आहे. दर बुधवार आणि शनिवारी येणार नवे भाग मालिकेच्या पुढील प्रसारणाचे वेळापत्रक जाहीर करताना अमोल कोल्हे म्हणाले की, “आता दर आठवड्याला दोन दिवस, म्हणजेच प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील. चॅनलने जिथे मालिका संपवली होती, तिथून पुढचा संपूर्ण इतिहास आणि स्त्री साक्षरतेचा धगधगता महायज्ञ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. हा आपला इतिहास आणि अभिमान आहे, तो लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे.” महाराष्ट्राचा डीएनए रडणारा नाही, लढणारा वाहिनीच्या निर्णयाला न जुमानता घेतलेल्या या भूमिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे भावुक आणि आक्रमक झाले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी हे शिवधनुष्य उचलतोय. वाहिनीने मालिका बंद केल्यावर प्रेक्षकांच्या मनात जी खदखद होती, तिला न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शेवटी महाराष्ट्राचा डीएनए हा रडणारा नाही तर लढणारा आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी चॅनलच्या व्यावसायिक धोरणांना सणसणीत टोला लगावला आहे. महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!: बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच पडीत सरकारी जमिनींचे संरक्षण आणि उत्पादनक्षम वापर हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सविसर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *