पुणे मनपातर्फे खडकवासला जलाशयात जलपूजन:शहराला वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी चांगल्या पावसाची प्रार्थना
खडकवासला धरण भरल्यानंतर सालाबादप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे खडकवासला जलाशय येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा व्हावा, तसेच नागरिकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विधिवत जलपूजन करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम…